गुजरातमधील बडोदा येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत काल, सोमवारी मध्यरात्री कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत येथे काम करणाऱ्या तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
काय आहे घटना
बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. माध्यमांनी दिलेल्या माहिनुसार स्थानिकांनी सांगितलं की, सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, काल रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला.
Gujarat: Three persons died after an under-construction building collapsed in Bawamanpura in Vadodara late last night. Rescue operation underway. pic.twitter.com/7xE1i1Xvjc
— ANI (@ANI) September 28, 2020
घटनास्थळी अग्निशमन दलाची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.