घरमुंबईऑनलाईन परीक्षेतही मिळणार वाढीव गुण 

ऑनलाईन परीक्षेतही मिळणार वाढीव गुण 

Subscribe

मुंबई विद्यापीठाने वाढीव गुण देण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर केला. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला डिस्टिंगशनसाठी किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेला एखाद-दुसरा वाढीव गुण देण्यात येतो. यंदा अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे होत आहे. त्यामुळे हे वाढीव गुण मिळणार की नाही याबाबत विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम होता. मात्र याबाबत मुंबई विद्यापीठाने वाढीव गुण देण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर केला. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोरोना आणि बदललेले परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले आहे. मात्र हे गुण नेमके कसे व कोणत्या प्रमाणात द्यायचे याबाबत विद्यापीठाने अधिक स्पष्टीकरण द्यावे. यापूर्वी सविस्तर उत्तरे द्या अशा स्वरुपातील परीक्षा होत असे. त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाढीव गुण देणे सोपे जात होते. मात्र आता बहुपर्यायी प्रश्न असल्याने हे गुण नेमके कसे द्यायचे याचे सूत्र काय असेल याबबात विद्यापीठाने स्पष्टता आणावी असेही प्राचार्यांचे म्हणणे आहे.  हे गुण ठरविण्याची जबाबदारीही विद्यापीठाने मोठ्या कॉलेजांवर दिली आहे. यामुळे सर्वांच्या गुणवाटपामध्ये एकसूत्रीपणा नसेल असे मतही प्राचार्य व्यक्त करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -