घरमुंबईलिंक अभावी अंतिम वर्षाचे विद्यार्थी चिंतेत; मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारचा फटका

लिंक अभावी अंतिम वर्षाचे विद्यार्थी चिंतेत; मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारचा फटका

Subscribe

यंदा प्रथमच होत असलेल्या ऑनलाईन परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना २४ तास अगोदर पाठवणे बंधनकारक असतानाही अनेक विद्यार्थ्यांना लिंक आणि हॉल तिकीटही मिळाले नाही.

मुंबई विद्यापीठाकडून घेतलेल्या एटीकेटीच्या परीक्षेतील गोंधळ दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) परीक्षेतही कायम आहे. आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच होत असलेल्या ऑनलाईन परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना २४ तास अगोदर पाठवणे बंधनकारक असतानाही अनेक विद्यार्थ्यांना लिंक आणि हॉल तिकीटही मिळाले नाही. हेल्पलाईन क्रमांकही बंद असल्याने शंकेचे निरसन होत नसल्याने विद्यार्थी प्रचंड चिंतेत पडले आहे.

मुंबई विद्यापीठाकडून एटीकेटीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाली तरी लॉगिन आयडी आणि पासवर्डची लिंक मिळत नाही. त्यामुळे एटीकेटीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यातच शनिवारपासून सुरू होत असलेल्या आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. परीक्षेच्या लिंकचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हा २४ तास अगोदर विद्यार्थ्यांना पाठवणे आवश्यक असतानाही शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना कोणताही लॉगिन आयडी व पासवर्ड मिळालेला नाही. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वीन केला असता त्यातील दोन लाईक दिवसभर बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्ड का मिळत नाही याबद्दल काहीच माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. यंदा प्रथमच ऑनलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना सरावासाठी पाठवण्यात येणारी लिंकही अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. परीक्षा तोंडावर आली आणि सराव परीक्षेची लिंक तर नाहीच पण परीक्षेसाठीचा लॉगिन आयडी आणि पासवर्डही मिळाला नसल्याने विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत. लिंक मिळाली नाही तर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले असले तरी लिंक न मिळाल्यामुळे आम्हाला मानसिक ताण आला आहे. अखेरच्या क्षणाला किंवा परीक्षा सुरू झाल्यानंतर लिंक मिळाल्यावर आम्हाला वेळेत परीक्षा देता येईल का? अचानक लिंक आल्यास आमचा गोंधळ उडू शकतो अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. परीक्षेचे शुल्क भरण्यास एक दिवस विलंब झाल्यास विद्यापीठाकडून आम्हाला परीक्षा नाकारली जाते. पण आमच्यासाठी महत्त्वाची असलेली परीक्षा घेण्यात विद्यापीठाकडून घालण्यात येत असलेल्या गोंधळाला कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला.

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत उडालेल्या गोंधळामध्ये कुलगुरूंनी व्यक्तिगत लक्ष घालून ही समस्या सोडवावी. यासाठी जबाबादार असलेल्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
– विठ्ठल परब, मुंबई महानगर सहमंत्री, अभाविप
काही तांत्रिक कारणास्तव विद्यार्थ्यांना लिंक मिळालेली नाही. ज्यांना लिंक मिळालेली नाही त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.
– विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी, आयडॉल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -