घरIPL 2020CSK vs SRH : चेन्नईची पराभवाची मालिका सुरुच; हैदराबादचा सुपर विजय

CSK vs SRH : चेन्नईची पराभवाची मालिका सुरुच; हैदराबादचा सुपर विजय

Subscribe

सनरायझर्स हैदराबादने चेन्नईला ७ धावांनी पराभूत करत दुसरा विजय नोंदवला आहे. हैद्राबादच्या १६५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकांत ५ गड्यांच्या मोदल्यात १५७ धावा केल्या. कर्णधार धोनीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हैदराबादचे गोलंदाज वरचढ ठरले. या पराभवामुळे चेन्नईची पराभवाची मालिका सुरुच आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला म्हणावा तसा सूर अद्याप सापडलेला दिसत नाही आहे. हैदराबादने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस या चेन्नईच्या सलामीवीरांकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. परंतू दोघांनीही आज निराशा केली. भूवनेश्वर कुमारने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवत चेन्नईला पहिला धक्का दिला. वॉटसनने केवळ १ धावा काढली. वॉटसन नंतर रायडू, केदार जाधव स्वस्तात तंबुत परतले. फाफ डु-प्लेसिसने संघाला सावरण्याचा प्रय्तन केला. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. फाफ डु-प्लेसिसने २२ धावा केल्या. फाफ डु-प्लेसिस बाद झाल्यानंतर धोनी आणि जडेजाने संघाचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. जडेजाने जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. मात्र, षटकार मारण्याच्या नादात तो नटराजनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जडेजाने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. यामध्ये ५ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश आहे. जडेजा बाद झाल्यानंतर कर्णधार धोनीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न तोकडा पडला. धोनीने ३६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. यात ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. मात्र, धोनीची खेळी व्यर्थ ठरली. चेन्नईचा या सामन्यात ७ धावांनी पराभव झाला.

- Advertisement -

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोला भोपळा देखील फोडता आला नाही. दीपक चहरने त्याला त्रिफळाचीत केलं. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी संघाला सावरत छोटी भागिदारी केली. ही जोडी स्थिर होत आहे असं वाटत असताना शार्दुल ठाकूरने मनिष पांडेला माघारी धाडलं. काही अंतराने वॉर्नरदेखील तंबुत परतला. वॉर्नरने २८ धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडपासून हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. मात्र नवखा प्रियम गर्गच्या शानदार अर्धशतकाच्या (५१) जोरावर हैदराबादने ५ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा करत चेन्नईला १६५ धावांचं आव्हान दिलं. चेन्नईकडून दीपक चहरने २ तर शार्दुल ठाकूर आणि पियुष चावलाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -