सक्तवसुली संचलनालयाने (ED) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. या कारवाई दरम्यान प्रताप सरनाईक हे परदेशात होते. मात्र कारवाईची बातमी कळताच आज संध्याकाळी ते मुंबईत परतले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीने ही कारवाई का केली? याबाबत मला नेमकी माहिती नाही. मी नक्कीच याची माहिती घेईल. तसेच सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी तयार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. आज सकाळी ईडीने सरनाईक यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आमदार प्रताप सरनाईक मुंबईत दाखल; ईडीच्या कारवाईवर दिली प्रतिक्रिया
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -