घरताज्या घडामोडीपंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Subscribe

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. पंकजा मुंडे यांनी ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली आणि त्यानंतर या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता त्या पुन्हा एकदा चाचणी करणार आहेत आणि मगच त्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत म्हणाल्या आहे की, ‘माझी कोरोना चाचणी निगेटिव्हा आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या, काळजी व्यक्त केली त्यांचे आभार. मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा चाचणी करेन मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन.’

- Advertisement -

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. पण त्यांना सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे आयसोलेट व्हावे लागले. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी ट्विट करून शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे असे आवाहन केले होते. त्यामुळे काल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी  पंकजा मुंडे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.

- Advertisement -

‘पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये. कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,’ अशी भावनिक सादच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना घातली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -