घरट्रेंडिंगचार्जिंगला लावलेला iPhone आंघोळ करताना मॉडेलच्या हातातून बाथटबमध्ये पडला आणि

चार्जिंगला लावलेला iPhone आंघोळ करताना मॉडेलच्या हातातून बाथटबमध्ये पडला आणि

Subscribe

आंघोळ करताना चार्जिंग लावलेला मोबाईल वापरत असला तर सावधान

सध्या मोबाईल चार्जिंग करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे मोबाईल सुरू ठेवण्यासाठी सतत चार्जिंग केला जात आहे. पण मोबाईल सतत चार्जिंग केल्याने त्याचा स्फोट होतो हे अनेकदा आपण ऐकले आहे. त्यामुळे आपल्याला नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोकं चार्जिंग करताना मोबाईलचा वापर करू नकोस असे नेहमी सावध करत असतात. पण याकडे आपण दुर्लक्ष करतो. असेच काहीस एका रशियाच्या मॉडेलसोबत घडले आहे. ही मॉडेल आपला आयफोन चार्जिंग लावून बाथटबमध्ये आंघोळ करताना वापरत होती. यादरम्यान तिच्या हातातला आयफोन पाण्यात पडला आणि वीजेचा जोरात झटका लागल्याने तिचा बाथटबमध्येच मृत्यू झाला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, २४ वर्षीय मॉडेल ओलेशिया सेमेनोवा (Olesya Semenova)रशियामध्ये आर्कान्जेस्क (Arkhangelsk) शहरामध्ये आपल्या एका मैत्रिणीसोबत राहत होती. मंगळवारी जेव्हा तिची मैत्रिण घरी पोहोचली तेव्हा तिला वाटले की, ओलेशिया बाहेर गेली आहे. पण जेव्हा ती बाथरुममध्ये गेली तेव्हा तिला धक्काच बसला. ओलेशियाची मैत्रिणी म्हणाली की, ‘ओलेशिया पूर्णपणे पिवळी पडली होती आणि ती श्वास देखील घेत नव्हती. मी खूप घाबरले होते आणि मी पोलिसांना फोन केला. जेव्हा तिला मी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मला वीजेचा जोरात झटका लागला. तिचा फोन पाण्यात पडला होता आणि चार्जिंगला लावलेला होता.’

- Advertisement -

तपासणी दरम्यान समोर आले की, ओलेशियाचा मृत्यू वीजेच्या झटक्यामुळे झाला आहे. ओलेशियाने फोन चार्जिंगसाठी ज्या सॉकेटचा वापर केला होता, ती मेन लाईन होती. तिचा आयफोन-८ पाण्यात पडला होता. दरम्यान ओलेशिया नेहमी बाथटबमध्ये बसून व्हिडिओ करत असते. त्यामुळे या दिवशी देखील ती व्हिडिओ करत असेल आणि यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली असेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, जर सॉकेट मेन लाईनमधील नसते तर शॉर्ट सर्किटनंतर ओलेशियाचा जीव वाचला असता. तसेच मोबाईल वॉटरप्रुफ असल्यामुळे तो पाण्यात पडल्यानंतर खूप वेळ सुरू होता आणि चार्जिंग देखील सुरुच होते. यापूर्वी रशियामध्ये १५ वर्षीय मुलगी अन्नाचा बाथरुममध्ये फोनमुळे वीजेचा झटका लागल्याने मृत्यू झाला होता.


हेही वाचा – होऊ दे खर्च! बर्गर खायला बुक केले २ लाखांचे हेलिकॉप्टर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -