घरताज्या घडामोडीशहर सुधारणा समिती; सभापतीपदाचे अर्ज अवैध

शहर सुधारणा समिती; सभापतीपदाचे अर्ज अवैध

Subscribe

नाशिक महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर सूचक अनुमोदकांची स्वाक्षरी जुळत नसल्याने ते अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे मोठाच कायदेशीर पेच निर्माण झाला असून सभापतीपदाच्या निवडीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

सभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने सुदाम डेमसे यांना तर भाजपच्या वतीने छाया देवांग यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र दोघांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेत. उपसभापती निवडणुकीतही भाजपच्या अलका अहिरे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शिवसेनेचे सुदाम डेमसे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या स्वाती भामरे यांची तर उपसभापतीपदासाठी मीरा हांडगे यांची निवड झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -