घरताज्या घडामोडीअमेरिकेत कोरोना लसीचा दिला पहिला डोस, ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा

अमेरिकेत कोरोना लसीचा दिला पहिला डोस, ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. जगात पहिल्यांदा कोरोना लसीकरण ब्रिटनमध्ये सुरू झाले. त्यानंतर कॅनडा सरकारने देखील कोरोना लसीच्या वापराला मंजूरी दिली. तसेच इस्रायलच्या पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या देशातील नागरिकांना २७ डिसेंबरपासून कोरोना लस देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता प्रत्येक देश हळूहळू कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करत आहे. दरम्यान आज अमेरिकेत कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. याच पार्श्वभूमीवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून अमेरिका आणि जगातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील आरोग्य कर्मचाऱ्याला फायझरच्या कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. Long Island Jewish Medical Center मध्ये तैनात असलेली नर्स सँड्रा लिंडसेला लाईव्ह टीव्हीवर कोरोना लसीचा डोस देण्यात आला.

अमेरिकेची औषध कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेकने विकसित केलेली कोरोना लस आतापर्यंत ब्रिटन, कॅनडा, बहरैन आणि सिंगापूरमध्ये दिली गेली आहे. अमेरिकाने शुक्रवारी फायझरने विकसित केलेल्या कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती.

- Advertisement -

आता अमेरिकेच्या इतिहासात महामारीविरोधात सर्वात मोठे लसीकरणाचे अभियान सुरू झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १६ लाखांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे आणि ७.१ कोटी लोकं संक्रमित झाले आहेत. तर अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – मेंदूची शस्त्रक्रिया चालू असताना मुलगी वाजवत होती पियानो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -