घरदेश-विदेशमेंदूची शस्त्रक्रिया चालू असताना मुलगी वाजवत होती पियानो

मेंदूची शस्त्रक्रिया चालू असताना मुलगी वाजवत होती पियानो

Subscribe

शस्रक्रियेदरम्यान सौम्याला कमी दर्जाचे बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. सहा तासांच्या शस्रक्रियेमध्ये सौम्या पियानो वाजवत होती. डॉक्टरांनी मुलीच्या मेंदूमध्ये असलेला ट्यूमर काढून टाकला. या संपूर्ण शस्रक्रियेमध्ये सौम्याला जराही वेदना झाल्या नाहीत.

मध्य प्रदेशच्या ग्वालिअर हॉस्पिटलमध्ये रविवारी एक अनोखी शस्रक्रिया करण्यात आली. एका नऊ वर्षांच्या मुलीला ब्रेन ट्यूमरचा आजार झाला होता. तिची ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. सहा तासांच्या या शस्रक्रियेमध्ये ९ वर्षांची चिमुरडी चक्क पियानो वाजवत होती. पियानो वाजवताना आपण आपल्या आयुष्यातील मोठ्या संकटाचा सामना करत आहोत याची तिला जराही जाणीव झाली नाही. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी ९ वर्षांच्या चिमुरडीची शस्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आले.

सौम्या असे लहान मुलीचे नाव आहे. तिच्य मेंदूमध्ये ट्यूमर असल्याने तो काढण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. हे ऑपरेशन खूप गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. शस्रक्रियेदरम्यान मेंदूची नस दबण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. सौम्याची शस्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी जागृत क्रेनियोटोमी पद्धतीचा वापर केला.

- Advertisement -

शस्रक्रियेदरम्यान सौम्याला कमी दर्जाचे बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. सहा तासांच्या शस्रक्रियेमध्ये सौम्या पियानो वाजवत होती. डॉक्टरांनी मुलीच्या मेंदूमध्ये असलेला ट्यूमर काढून टाकला. या संपूर्ण शस्रक्रियेमध्ये सौम्याला जराही वेदना झाल्या नाहीत. ती संपूर्ण शस्रक्रियेमध्ये पियानो वाजवण्यात रमली होती, असे तिच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षापासून सौम्या ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होती. ब्रेन ट्यूमरमुळे तिला खूप त्रास होत होता. सौम्याचे वय कमी असल्याने तिच्यावर शस्रक्रिया करणे धोकादायक होते. म्हणून डॉक्टरांनी क्रेनियोटोमी नावाच्या पद्धतीने मुलीची शस्रक्रिया केली. या पद्धतीत रूग्णाला पूर्णपणे बेशुद्ध न करता केवळ एक अवयव किंवा शस्रक्रियेचा ठराविक भाग सुन्न केला जातो. संपूर्ण शस्रक्रियेदरम्यान डॉक्टर मुलीशी बोलत होते. तिला त्यांनी पियानो वाजवायला सांगितल. मुलगी संपूर्ण सहा तासांच्या शस्रक्रियेमध्ये पियानो वाजवत होती असे तिच्या डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Gold Price Today: सोने-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजची किंमत

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -