घरमनोरंजनउर्मिला मातोंडकरचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक

उर्मिला मातोंडकरचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक

Subscribe

उर्मिलाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार पोलिसात केली आहे. पोलिसांनी काही अज्ञात व्यक्तींच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. उर्मिलाना ट्विट करून याची माहिती दिली आहे. ‘सुरूवातीला ते डीएम (डायरेक्ट मेसेज) करतात. काही स्टेप्स फॉलो करण्याच्या सूचना देतात आणि त्यानंतर ते तुमचे अकाउंट हॅक करतात. खरंच?’ असे उर्मिला तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उर्मिलाच्या आधी आज सकाळी महाविकास आघाडीचे मंत्री सतेज पाटील यांचेही ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांच्या ट्विटरवरून त्यांचे फोटोस, व्हिडिओ आणि ट्विट डिलीट झाल्याचे समजते आहे.

- Advertisement -

उर्मिलाने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार पोलिसात केली आहे. पोलिसांनी काही अज्ञात व्यक्तींच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. उर्मिलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील तिचे सर्व फोटो, व्हिडिओ आणि सगळ्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. उर्मिला सोशल मीडियावर बरिच सक्रिय असते. उर्मिलाने शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर ती बऱ्यापैकी कामाला लागली होती. गेल्या काही दिवसांपासून उर्मिलाने कंगनाच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.

उर्मिलाने १ डिसेंबरला शिवसेनेत पक्षप्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उर्मिलाने शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला. उर्मिला मातोंडकरने शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर तिचे नाव विधानपरिषदेच्या १२ राज्यपाल निर्वाचित जागांसाठी पाठविण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Adipurush: ‘रामा’वर वादग्रस्त वक्तव्य; सैफ अली खान विरोधात गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -