घरताज्या घडामोडी'रावणाचा प्राण नाभीत तर, भाजपच्या यशाचा आत्मा EVM मध्ये'

‘रावणाचा प्राण नाभीत तर, भाजपच्या यशाचा आत्मा EVM मध्ये’

Subscribe

रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता तसाच भाजपाच्या यशाचा आत्मा हा ईव्हीएममध्ये आहे. म्हणूनच त्यांचा बॅलटपेपरवर विश्वास दिसत नाही, असे उत्तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवानंतर भाजप नेत्यांनी आता बॅलट पेपरवर देखील शंका उपस्थित केली आहे. भाजपचा झालेला पराभव बॅलट पेपरमधील गडबडीमुळे झाल्याची शंका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यांची ही शंका एका अर्थाने ईव्हीएममधील गडबडीला दुजोरा देणारी आहे. कारण ईव्हीएमने मतदान झाले तरच भाजप विजयी होऊ शकतो. ज्याप्रमाणे रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता तसाच भाजपच्या यशाचा आत्मा हा ईव्हीएममध्ये आहे. म्हणूनच त्यांचा बॅलटपेपरवर विश्वास दिसत नाही, असे उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

- Advertisement -

भाजप नेस्तनाबूद होईल

‘भाजपचा झालेला पराभव बॅलट पेपरमधील गडबडीमुळे झाल्याची शंका चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ज्यावेळी बॅलट पेपरने निवडणूका होतील त्यावेळी संपूर्ण भाजप नेस्तनाबूद होईल. पदवीधरांनी आणि शिक्षकांनी मतदान केले आहे आणि ते खरं मतदान आहे. ते खरं मतदान यासाठी आहे कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कालावधीमध्ये १२ कोटीपेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले आहे. याचा राग येणे निश्चित आहे. ज्यापद्धतीने २ कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार, असं म्हटलं होतं. पण, यावर्षी मोदींनी न्हाव्याला देखील रोजगार दिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या गोष्टीचा लोकांमध्ये राग असल्याचे दिसून येत आहे. जो राग ‘मन की बात’च्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. कारण लोक त्यांचे व्हिडिओ डिसलाईक करत आहेत. आज जो ट्रेंड होत आहे, मोदीजी बकवास बंद करो. ही वस्तुस्थिती आहे. देशाला अधोगतीला लावले असून मोदींबद्दल तोच आक्रोश या निवडणुकीतून दिसून आलेला आहे’, असा हल्लाबोल्ल सचिन सावंत यांनी ट्विटर वरुन केला आहे.


हेही वाचा – खुशखबर! राज्यात लवकरच पोलीस हवालदार पदांची भरती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -