घरटेक-वेकApple च्या पहिल्या-वहिल्या संगणकाचा लिलाव

Apple च्या पहिल्या-वहिल्या संगणकाचा लिलाव

Subscribe

अॅपलचा पहिला संगणक 'अॅपल १' चा लिलाव करण्यात आला असून, ८.१५ लाख डॉलर्समध्ये (सुमारे ५.४६ कोटी रुपये) त्याची विक्री झाली.

जगभरातील लोकांना ‘स्टेटस’ मिळवून देणारी अॅपल कंपनी आणि अॅपलचे प्रॉडक्ट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र, सध्या Apple ब्रॅंड एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अॅपलच्या पहिल्या-वहिल्या संगणाकाच्या प्रतिरुपाचा नुकताच लिलाव करण्यात आला. Apple सारख्या जगविख्यात कंपनीच्या पहिल्या संगणाकाचा लिलाव झाल्यामुळे, सध्या हा चर्चेचा विषय ठरतो आहे. अॅपलचा पहिला संगणक ‘अॅपल १’ चा लिलाव करण्यात आला असून, त्याचं प्रतिरुप ८.१५ लाख डॉलर्समध्ये (सुमारे ५.४६ कोटी रुपये) विकला गेला. दरम्यान या लिलावाबाबत जगभरातून अनेकविध प्रश्नही उपस्थित केले जात आहे. अॅपल कंपनीची पहिली निर्मिती आणि कंपनीची शान असलेला असलेला ‘अॅपल १’ हा पहिला-वहिला संगणक लिलावात विकण्याची वेळ अॅपलवर का आली असावी? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘चॅरिटीबझ’ मार्फत हा लिलाव करण्यात आला असून, ‘Apple 1’चं प्रतिरुप खरेदी करण्यासाठी एकूण ८० लोक या लिलावात सहभागी झाले होते. उपलब्ध माहितीनुसार, ‘अॅपल १’ ची खरेदी ग्लेन अाणि शेनाॅन या दामपत्त्याने केली.

apple 1
‘अॅपल १’ संगणाकारे प्रतिरुप (सौजन्य- m.phys.org)

Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि व्होजनियाक यांनी १९७६ मध्ये ‘अॅपल १’ सगंणक बनवण्यास सुरुवात केली होती. एका छोट्याशा गॅरजेमध्ये या दोन तज्ज्ञांनी Apple कंपनीची सुरुवात केली. ‘अॅपल’ सारखी जागतिक पातळीवरील सर्वात मोठी आणि आधुनिक कंपनी उभं करणं, हे स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह व्होजनियाक याचं स्वप्न होतं. एका साध्या गॅरेजमधून सुरु झालेला हा प्रवास आज इतक्या मोठ्या मुक्कामापर्यंत जाऊन पोहचला आहे. उपलब्ध माहितीनुसार ‘अॅपल १’ संगणकाची निर्मीती करण्यासाठी, या दोन पार्टनर्सना आपल्या घरातील अनेक गोष्टी विकून पैसा उभा करावा लागला होता. मात्र, त्यावेळेच्या त्यांच्या मेहनतीचे आज खऱ्या अर्थाने चीझ झाले असंच म्हणावं लागेल.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -