घरताज्या घडामोडीराज्यपाल दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना, राजभवनाचे स्पष्टीकरण

राज्यपाल दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना, राजभवनाचे स्पष्टीकरण

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २५ जानेवारीच्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राज भवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे आज राज भवनकडून स्पष्ट करण्यात आले होते.

कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत गेली दोन महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही पांठिबा देत सोमवारी दुपारी मुंबई मेट्रो परिसरात ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्रातील विविध भागातून शेतकरी आंदोलनासाठी दाखल झाले होते. राजभवनात राज्यपाल नाहीत म्हणून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिर‍िक्त कार्यभार असल्याने ते २५ जानेवारीला गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोध‍ित करणार आहेत. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २५ जानेवारीच्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राज भवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे आज राज भवनकडून स्पष्ट करण्यात आले होते.

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना २२ जानेवारीला निमंत्रीत करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रकाश रेडडी यांना २४ जानेवारीला लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धते विषयी कळविण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी व्हॉटसॲप मेसेजद्वारे निरोप मिळयाल्याचे मान्य केले होते. प्रकाश रेड्डी यांनाही या बाबतचे लेखी पत्र २४ जानेवारीला मिळाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राज भवनातून स्पष्ट करण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून २५ जानेवारी ला सध्याकाळी ५ वाजता निवेदन स्विकारतील असे धंनजय शिंदे यांना आधीच कळविण्यात आले होते. ही गोष्ट मान्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.


हेही वाचा – शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील लोकं – प्रविण दरेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -