घरपालघरग्रामीण भागात निकृष्ट दर्जाची कामे

ग्रामीण भागात निकृष्ट दर्जाची कामे

Subscribe

डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात रस्ते, पाणी पुरवठा, शासकीय इमारती, गटार,सार्वजनिक शौचालय इ कामे अगदीच निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.

शासनस्तरावरून कोट्यवधी रुपये ग्रामीण भागाच्या विकासासाठी खर्च केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात ग्रामीण भागाचा विकास होत आहेत का? ग्रामीण भागातील विकासकामे चांगल्या दर्जाची आणि ठरवलेल्या तपशीलाप्रमाणे होतात का? संबंधित अधिकारी अभियंता कामाच्या दर्जाची चौकशी करतात का? कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य उदा. सिमेंट, विटा, डांबर, रेती, खडी इ. चांगल्या दर्जाचे वापरले जाते का? हे सर्व प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला ह्या सर्व गोष्टींची माहिती नसल्यामुळे कंत्राटदार, संबंधित अधिकारी/अभियंता यांचे चांगलेच फावत असल्याच्या तक्रारी आहेत.

काही बांधकामामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, ह्यात दुमत नाही, परंतु काही ठेकेदारांमुळे सगळ्याच ठेकेदारांना वेठीस धरणे योग्य वाटत नाही. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आहेत, त्या संबंधात आम्ही वरिष्ठस्तरावर चौकशी करीत आहोत आणि संबंधित ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आम्ही जनतेला आव्हान करतो की जर एखाद्या ठिकाणी कामाचा दर्जा योग्य नसेल तर तक्रारदाराने आमच्याशी संपर्क साधावा. संबंधित काम योग्य दर्जाचे करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– काशीनाथ चौधरी, बांधकाम सभापती, जिल्हापरिषद पालघर

- Advertisement -

डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात रस्ते, पाणी पुरवठा, शासकीय इमारती, गटार,सार्वजनिक शौचालय इ कामे अगदीच निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. ठेकेदार २० टक्के ते २५ टक्के कमी पैशात कमी करण्यासाठी तयार होतात. त्यात शासनाचा वस्तू व सेवा कर विभागाला १२.०५ टक्के कर द्यावा लागतो. एकूणच १० लाखाचे काम जर २५ टक्के कमीने घेतले तर त्यात १२.०५ टक्के वस्तू व सेवा कर भरून ६,२५,००० रुपये एवढी रक्कम उरते. तर शासनस्तरावर ज्या कामाचे अंदाजपत्रक १० लाख ठरवले जाते ते काम करण्यासाठी ठेकेदारकडे 6 लाख 25हजार रुपये उरतात आणि एवढ्या रकमेत ठेकेदार १० लाखाचे काम कोणत्या पद्धतीने करत असेल याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत.

अंदाजपत्रकापेक्षा १८ टक्के ते २० टक्के कमी रकमेत काम करत असल्यामुळे कामाचा दर्जा खालावत चालला आहे. संबधित अभियंत्यांने वेळोवेळी चाचणी करून कामाची पाहणी करणे आवश्यक आहे. 
– सुभाष चौरे, पंचायत समिती सदस्य, डहाणू

- Advertisement -

काम सुरू करण्यापूर्वी सिमेंट, रेती, डांबर, विटा इ. साहित्यांची प्रयोगशाळेतून चाचणी करून घेणे आवश्यक असते. साहित्य योग्य प्रतीचे आहे की नाही त्यात काय-काय वापरले आहे तसेच बांधकाम टिकाऊ होणार की नाही तसेच ते काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये यासाठी चाचणी अहवाल महत्वाचा असतो. मात्र तसे होताना दिसत नाही. चलती का नाम गाडी; अशा पद्धतीचा कारभार सुरू असल्याचे दिसते आहे. त्यामुळेच बांधकाम एक-दोन वर्षातच फुटून-तुटून भंगार स्वरूपाचे झालेले दिसते तसे अधिकारी व कर्मचारीदेखील जबाबदारी घेण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे ठेकेदार व कार्यान्वित यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करून घेत असतात. आज कित्येक कामे शासकीय स्तरावर, ग्रामीण व शहरीस्तरावर केली जातात. पण याकडे कुणी लक्ष घालत नाही. तर अशा कामांवर साहित्य चाचणी अहवाल घेणे गरजेचे असून याबाबत शासकीय स्तरावर दखल घेणे गरजेचे असताना त्याकडेही कानाडोळा केला जात असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा –

मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -