घरटेक-वेकInstagram वरील डिलीट पोस्टही करता येणार रि-स्टोर

Instagram वरील डिलीट पोस्टही करता येणार रि-स्टोर

Subscribe

नव्या फिचर्ससाठी सध्याचे Instagram करावे लागणार अपडेट

सध्या तरुणामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या Instagram या फोटो शेअरिंग अॅपमध्ये नवनवीन फिचर्स अॅड होत आहेत. यातच आता Instagram ने युजर्ससाठी नवा फिचर आणला आहे. या नव्या फिचरमुळे इंस्टाग्रामवर डिलिट झालेल्या पोस्ट यूजर्सला पुन्हा मिळवता येणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या Instagram या नव्या फिचरवर सध्या काम करत आहे. परंतु या नव्या फिचर्ससाठी तुम्हा सध्याचे Instagram अॅप अपडेट करावे लागणार आहे. त्यानंतर अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘रिसेंटली डिलीटेड’ पर्यायावर टॅप करावे लागेल.

या नव्या फिचरची माहिती Instagram ने नुकतीच एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या फिचरमुळे ३० दिवसांमध्ये डिलीट झालेल्या पोस्ट पुन्हा रिस्टोअर करता य़ेणार आहे. यासााठी Instagram मध्ये पोस्ट रि-स्टोअर असा पर्याय सेटिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे फोटो, व्हिडिओ, रील्स आणि IGTV व्हिडिओ डिलीट झाल्या असतील तर त्या पुन्हा रिस्टोर करु शकता. विशेष बाब म्हणजे या फिचरमुळे स्टोरीही रि-स्टोर करता येणार आहेत. पण स्टोरी रिस्टोरींगसाठी २४ तासांचाच कालावधी असणार आहे.

- Advertisement -

Instagram जर तुम्ही या फिचरसाठी अपडेट केलात तर डिलिट झालेले फोटो, व्हिडिओ, रिल्स आणि IGTV व्हिडिओ टाईमलाईनवरून कामय हटवल्या जतील. पण हा डाटा कंपनी ‘रिसेंटली डिलिटेड फोल्डर’मध्ये तो सेव्ह करेल. या फोल्डरमधून तुम्ही तो डाटा ३० दिवसांमध्ये रि-स्टोअर करु शकाल.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -