घरट्रेंडिंगUPSC Recruitment 2021: जॉईंट सेक्रेटरीसह डायरेक्टरच्या पदाकरता मोठी भरती; वाचा सविस्तर

UPSC Recruitment 2021: जॉईंट सेक्रेटरीसह डायरेक्टरच्या पदाकरता मोठी भरती; वाचा सविस्तर

Subscribe

इच्छुक उमेद्वारांना ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक असणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सहसचिव (जॉईंट सेक्रेटरी) व संचालक (डायरेक्टर) स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवार upsconline.nic.in वर भेट देऊन डाउनलोड करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२१ असून उमेदवारांची भरती कराराच्या आधारे केली जाणार आहे. सहसचिव पदाच्या ३ पदांकरता आणि संचालकांच्या २६ पदांवर उमेदवारांची भरती होणार आहे. वेगवेगळ्या विभागांच्या संचालकांच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. ज्यांची संपूर्ण माहिती अधिसूचनेत उपलब्ध आहे. या पदाकरता अर्ज करताना उमेदवार केवळ ऑनलाईनद्वारे अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेद्वारांना ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक असणार आहे. तर अर्ज करताना उमेदवारांना त्यांच्या सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेली एक प्रत अपलोड करावी लागणार आहे. सहसचिव पदांवर भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा ४० ते ५५ वर्षे असून त्यानुसार 7th CPC नुसार उमेदवारांना सुमारे २ लाख २१ हजार रुपये पगारावर रूजू करण्यात येणार आहे. तर संचालक पदांची वयोमर्यादा ३५ ते ४५ वर्षे असून वेतनश्रेणी 7th CPC नुसार सुमारे १ लाख ८२ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. भरती, निवड आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात इतर कोणतीही माहिती मिळविण्यासाठी अधिकृत अधिसूचना तपासून घ्या.

- Advertisement -

भरती, निवड आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

वरील पदांकरता अर्ज करायचा असल्यास https://www.upsconline.nic.in/oralateral/VacancyNoticePub.php या लिंकवर भेट द्या.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -