घरक्राइमधक्कादायक! अंधश्रद्धेतून आईनेच दिला पोटच्या ६ वर्षाच्या लेकराचा नरबळी

धक्कादायक! अंधश्रद्धेतून आईनेच दिला पोटच्या ६ वर्षाच्या लेकराचा नरबळी

Subscribe

मुलाची हत्या करुन केली पोलिसांत तक्रार

देशात अनेक जिल्ह्यात नरबळी देण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता केरळमधील पलक्कड जिल्ह्यात एका आईनेच स्वतःच्या ६ वर्षीय मुलाचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशात अंधश्रद्धेच्या नावाखाली तांत्रिक मांत्रिक आपली शक्ती वाढवण्यासाठी किंवा अघौरी शक्ती प्राप्त करण्यासाठी नरबळी देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. महारष्ट्रातही नरबळी दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. केरळमधील महिलेने शक्ती वाढवण्यासाठी स्वतःच्या मुलाचा नरबळी दिला आहे. जादूटोणाविरोधी कायदे असतानाही देशातील अंधश्रद्धा कमी होत नाही आहे. उत्तर भारतातही मागील वर्षात नरबळीचे अनेक प्रकार घडले आहेत.

केरळमधील पलक्कड जिल्ह्यात आईनेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. नरबळी देण्याच्या उद्धेशाने तिने मुलाचा झोपेत असतानाचा खून केला आहे. धक्कादायक प्रकार आसा आहे की, हत्या केल्यानंतर आईनेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाची पत्नीने हत्या केली असल्याची पतीला काहीच चाहूल नव्हती. जेव्हा पोलीस घरी पोहोचले तेव्हा पतीला घटनेची माहिती मिळाली. पोलीसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. महिलेची चौकशी केली असताना नरबळीच्या उद्देशाने मुलाचा खून केल्याचा जबाब नोंदवला आहे.

बीडमध्ये म्हशीवर करणी केल्यामुळे मुलाचा नरबळी

बीड जिल्ह्यात म्हशीला करणी करुन मारल्याप्रकरणी एका ६ वर्षीय मुलाचा नरबळी घेतला आहे. मुलगा शाळेत खेळायला गेला होता. परंतु संध्याकाळी तो परतला नाही. यामुळे गावात शोधाशोध सुरु झाली. शोधत असताना शाळेच्या आवारात त्या मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मुलाची हत्या म्हशीवर करणी केल्याच्या कारणातून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -