घरमहाराष्ट्रPune: सहाय्यक पोलीस आयुक्तांचे श्वान चोरणारी टोळी ताब्यात

Pune: सहाय्यक पोलीस आयुक्तांचे श्वान चोरणारी टोळी ताब्यात

Subscribe

सध्या चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरीचा एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. चोरट्यांनी थेट श्वानांचीच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहराच्या पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांचे दोन विदेशी श्वास चोरांनी पळवले. पोलिसांनी तात्काळ तपास केल्याने पळवलेले विदेशी श्वस भेटण्यास मोठी मदत झाली. चक्क पोलीस अधिकाऱ्याच्याचं घरतील श्वानांची चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विजय चौधरी हे त्यांच्या कुटुंबासोबत पुण्याच्या शासकीय निवासस्थान राहतात. त्यांच्या बंगल्यात दोन विदेशी श्वान त्यांनी पाळले आहेत. बंगल्यातील दोन्ही श्वान एकाच वेळी अचानक गायब झाल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला. पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केल्याने दोन्हा श्वान भेटले. बंगल्यात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन्ही श्वान मिळाले.

विजय चौधरी यांच्या बंगल्यातील दोन्ही श्वान अचानक गायब झाल्याने सगळ्यांनी बंगल्याच्या आजूबाजूला श्वानांची शोधाशोध सुरु केली. पोलिसांनी बंगल्यातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यातून शहरातील श्वान चोरांच्या सक्रिय टोळीने दोन्ही श्वान चोरुन नेल्याचे समोर आले. टोळीतील दोघांना हे श्वान दिसल्यानंतर त्यांनी बाईकवरुन दोघांना पळवून नेले. श्वान हडपसर भागात असल्याची माहिती हवालदार चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार हडपसर भागात तपस करून पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून पळवलेले श्वान ताब्यात घेऊन ते सहायक आयुक्त विजय चौधरी यांच्या स्वाधीन केले.

- Advertisement -

शहरात काही दिवसांपासून श्वान चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून विदेशी प्रजातीच्या श्वानांची चोरी करून विक्री केली जात आहे. यापूर्वी पोलिसांनी अशा टोळीवर केलेल्या कारवाईनंतर अशा चोऱ्या थांबल्या होत्या मात्र, आता पुन्हा टोळी सक्रिय झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.


हेही वाचासोनं तस्करीसाठी लढवली भन्नाट शक्कल, चक्क गिळल्या १६१ सोन्याच्या कॅप्सूल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -