घरताज्या घडामोडी...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

Subscribe

गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.

राज्यसभेतल्या चार खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांना आज सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना भावूक झाले. पंतप्रधान मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. जम्मू काश्मीरमधील हल्ल्यानंतर गुलाम नबी आझाद यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी सभागृहात भावूक झाले.

पंतप्रधान मोदी यांनी एक आठवण सभागृहात सांगितली. जेव्हा गुजरातमधील प्रवाशांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा गुलाम नबी आझाद जी यांचा पहिला फोन मला आला. तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता, गुलाम नबी आझाद यांचे अश्रू फोनवर थांबत नव्हते. पीएम मोदी म्हणाले की त्यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षणमंत्री होते, त्यानंतर सैन्यांच्या विमानाची व्यवस्था करण्यास सांगितली. त्याच वेळी गुलाम नबी आझाद यांनी विमानतळावरून फोन केला, जसं काही त्यांच्या कुटुंबातीलच एखादी व्यक्ती, त्याचप्रमाणे आझादजींनी त्यांची काळजी घेतली, असं मोदींनी सांगितलं.

- Advertisement -

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गुलाम नबी आझाद देखील पक्षासमवेत देशाचा विचार करतात. कुणीही त्यांची जागा भरुन काढणार नाही. जेव्हा मी निवडणुकीच्या राजकारणात उतरलो नाही, त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि मी लॉबीमध्ये बोलत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा पत्रकारांनी आम्हाला बोलताना पाहिले तेव्हा गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना उत्तर दिलं की, टीव्हीवर नेते वाद करताना पाहता. मात्र इथे कौटुंबिक सदृश वातावरण आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -