घरताज्या घडामोडीकुख्यात गुंड अरुण गवळी कोरोना पॉझिटिव्ह

कुख्यात गुंड अरुण गवळी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन आणि डॅडी नावाने ओळखले जाणार अरुण गवळीला जेलमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या नागपूर कारागृहात अरुण गवळी असून त्याच्यावर त्याच ठिकाणी कोरोना संदर्भातील उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अरुण गवळीला कोरोनाची लक्षण दिसली होती. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली असून चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अरुण गवळी व्यतिरिक्त चार कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गेल्या वर्षी पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने ३० दिवसांची पॅरोल रजा मागितली होती. नागपूर विभागीय आयुक्तांनी अरुण गवळीचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देत पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याआधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली होती.यापूर्वी अरुण गवळी ३ ते ४ वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचे लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. तसेच गेल्या वर्षी मे महिन्यात देखील मुलीच्या लग्न निमित्ताने अरुण गवळी जेलबाहेर आला होता.

- Advertisement -

अरुण गवळीवर हे आरोप

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी ३० लाखांची रक्कम मागितली होती.


हेही वाचा – किरीट सोमय्या यांना अलिबाग पोलिसांकडून अटक

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -