घरताज्या घडामोडीसर्वोच्च न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळली, रवी राजा विरोधी पक्षनेते पदी कायम

सर्वोच्च न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळली, रवी राजा विरोधी पक्षनेते पदी कायम

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत रवी राजा यांनी आनंद व्यक्त केला असून काँग्रेसच्या गोटातही आनंदी आनंद आहे.

मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारी भाजपची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावत रवी राजा यांच्या विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भाजपला मुंबई उच्च न्यायालयापाठोपाठ आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही विरोधी पक्षनेतेपदाबाबत चांगलीच चपराक बसली आहे. या निकालाबाबतची माहिती पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत रवी राजा यांनी आनंद व्यक्त केला असून काँग्रेसच्या गोटातही आनंदी आनंद आहे. मात्र भाजपच्या गोटात या निकालाने उदासीनता पसरली आहे. आता या निकालाबाबत भाजपकडून फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सन २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेला सर्वात जास्त जागा मिळाल्या. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होती. मात्र विरोधी पक्षनेते पदावर त्यावेळी भाजपने दावा न केल्याने पालिका नियमानुसार तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही सेना भाजप एकमेकांविरोधात लढले. मात्र सरकार स्थापन करण्याबाबत सेना भाजप यांच्यात टोकाचा वाद झाला आणि शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला हाताशी धरून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे सेना भाजपात आणखीन टोकाचे वाद झाले.

- Advertisement -

त्यानंतर भाजपने पालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला. मात्र महापौरांनी पालिका नियमांचा दाखला देत भाजपचा दावा फेटाळून लावला होता. त्यावर भाजपने उच्च न्यायालयात दावा केला होता. मात्र न्यायालयाने भाजपचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु उच्च न्यायालयानेही भाजपची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे अस्वस्थ भाजपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विरोधी पक्षनेते पदावर पुन्हा एकदा दावा केला. परंतु आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानेही भाजपची याचिका फेटाळली. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘माझ्याकडेपण भाजप नेत्यांच्यी डझनभर ‘एक्स्ट्रा’ प्रकरणं’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -