घरमुंबईसर्वसामान्यांना फटका! मुंबईत रिक्षा टॅक्सीची ३ रुपयांची भाडे वाढ

सर्वसामान्यांना फटका! मुंबईत रिक्षा टॅक्सीची ३ रुपयांची भाडे वाढ

Subscribe

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत भाडेवाढी संदर्भातील निर्णय केला जाहीर

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे वाढते पेट्रोल, डिझेलच्या दर खासगी वाहन चालकांचा खिसा खाली करतायंत. यातच आता सर्वसामान्यांनाही बसणार आहे. कारण पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांनीही भाव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत भाडेवाढी संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ही भाडेवाढ १ मार्च २०२१ पासून लागू होईल. टेरिफ कार्डप्रमाणे भाडेवाढ घ्यावी लागेल. त्यामुळे २०२१ पर्यंत सर्व रिक्षा चालकांनी आपले टेरिफ कार्ड अपडेट करुन घ्यावे. त्यामुळे १ मेपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी टेरिफ कार्ड अपडेट करावे लागणार आहे. तर १ जून पासून भाडे मीटरमध्ये दिसली पाहिजे अशी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे  टॅक्सीचे भाडे २२ रुपये पर मीटरवरून २५ रुपये करण्यात आले आहे. आत्ताच्या नव्या भाडेवाढीप्रमाणे रिक्षाचे भाडे २ रुपये १ पैसे झाली तर टॅक्सीची भाडेवाढ २ रुपये ९ पैशांनी झाली आहे. ही भाडेवाढ एमएमआरडीए व्हिजनसाठी असणार आहे.
खडवा समितीच्या निकषानुसार ही भाडेवाढ झाली आहे. या समितीत संघटनांचा समावेश असतो. त्यामुळे सर्व घटकांचा विचार करुन ही भाडेवाढ झाली आहे. सहा वर्षे भाडेवाढ झाली नाही. खूप वर्षापासून ही भाडेवाढ देय आहे. त्यामुळे ही भाडेवाढ मदत म्हणून दिली आहे. रिक्षा, टॅक्सी चाकल समाजाचा एक घटक आहे. त्यामुळे सरकारने त्यांना मदतीचा एक हात देणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे शेअर रिक्षा भाडे संदर्भातही लवकरचं निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्च केले.

त्यामुळे टॅक्सी-रिक्षाच्या भाड्यात कमीतकमी ३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना टॅक्सीतून प्रवास करताना आता २२ रुपयांऐवजी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर रिक्षाने प्रवास करताना १८ रुपयांऐवजी २१ रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. (Mumbai Auto-taxi fares hike by 3 rupees in Mumbai) ही नवी भाडे वाढ मुंबईसह, ठाणे, नवी मुंबईमध्ये लागू केली जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे अनेक रिक्षा, टॅक्सी चालक, मालक संघटनांनी स्वागत केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकणी शेअर रिक्षांचे भाडे देखील वाढवले होते. त्यामुळे प्रवासी संघटनांकडून किंवा प्रवाशांकडून या भाडे वाढीला विरोध होत होता. मात्र आता अधिकृत भाडे वाढीचा निर्णय झाल्याने रिक्षा चालकांनाही भाडे आकारताना अडचणी येणार नाहीत. मात्र सर्वसामान्य प्रवाशांचा खिसा मात्र खाली होणार आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -