घरताज्या घडामोडीमुंबईसारखीच तेलंगणात बत्ती गुल, संशयाची सुई डेटा चोर चीनकडे

मुंबईसारखीच तेलंगणात बत्ती गुल, संशयाची सुई डेटा चोर चीनकडे

Subscribe

तेलंगणातही 'बत्ती गुल' करण्याचा प्रयत्न झाला. मात्र 'कॉम्प्युटर इमरेंजन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडीया'ने सतर्कता दाखवत हॅकर्सचा हा डाव हाणून पाडला .

गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा वीज पुरवठा अचानक खंडीत झाला होता. (Blackout) त्याघटनेमागे चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाईम्सने’ केला आहे. त्यावरून देशात गदारोळ सुरू असतानाच आता तेलंगणातही ‘बत्ती गुल’ करण्याचा प्रयत्न झाला. मात्र ‘कॉम्प्युटर इमरेंजन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडीया’ने सतर्कता दाखवत हॅकर्सचा हा डाव हाणून पाडला . दरम्यान, यामागे चीनी हॅकर्सचं (Chinese Hackers)असल्याचा संशय तेलंगणा उर्जा विभागाने व्यक्त केला आहे.

चीनी हॅकर्सने तेलंगणा ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर, टीएस ट्रान्स्को यासह इतर सेंटर्सवर सायबर हल्ला करण्याची योजना आखली होती. ‘टीएस ट्रान्स्को’ आणि ‘टीएस गेनको’ तेलंगणाचे प्रमुख उर्जा प्रणाली आहेत. यामुळे चीनी हॅकर्सने तेलंगणाचा वीज पुरवठा खंडीत करण्याबरोबरच डेटा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र गेनकोला संशय आला व त्यांनी संशयित ‘आईपी अॅड्रेसच’ वेळेत ब्लॉक केला. त्यानंतर संबंधित विभागात काम करणाऱे अधिकारी आणि पॉवर ग्रिडचा डेटा तात्काळ बदलण्यात आला. यामुळे चीनी हॅकर्सला तेलंगणात ब्ल़ॅक आऊट करता आले नाही असेही तेलंगणा उर्जा विभागाने म्हटले आहे. त्यातच नुकत्याच एका संशोधनात जूलै २०२० नंतर आतापर्यंत कमीत कमी १२ संघटना, वीज केंद्र आणि लोड डिस्पैच केंद्रातील कॉम्प्युटरर्स हॅक करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सने केला. तसेच या कॉम्प्युटरर्समध्ये मालवेअर सोडण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे सगळ्या यंत्रणा ठप्प होतील असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अमेरिकन कंपनीने केला होता खुलासा
अमेरिकन कंपनी रिकॉर्डेड फ्यूचर ही इंटरनेटच्या वापरावर संशोधन करते. या संशोधनात चीनी हॅकर्सने आतापर्यंत कुठे हॅकींग केले ते समोर आले आहे. त्यात एनटीपीसी, ५ रिजनल लोड डिस्पैच सेंटर आणि दोन बंदरांचाही समावेश आहे. तसेच हॅकींगच्या या घटना लडाख सीमारेषेवर भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान सुरू झाल्याचे या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले. तसेच भारतात ब्लॅक आऊट करण्याचा चीनकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून भारताने सावध राहण्याची गरज असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -