घरठाणेएनआरसी कामगारांचा संघर्ष अधिक तीव्र होणार

एनआरसी कामगारांचा संघर्ष अधिक तीव्र होणार

Subscribe

अनेक नेत्यांना कामगारांचा साकडे

मागील बारा वर्षासून बंद असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांनी बेमुदत आंदोलन उभारले असून आज या आंदोलनाला २१ दिवस झाले आहेत. कंपनीने कामगारांची देणी न देताच आपल्या मालकीची ४५० एकर जमीन बांधकाम व्यावसायीकांच्या घशात घातल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. आपल्या न्याय हक्काची देणी न मिळाल्याने कामगारांनी वसाहत खाली न करण्याच्या निर्धाराने लढा सुरू ठेवला होता. मागील महिन्यात जमीन खरेदी केलेल्या मालकांने वसाहतीतील मोकळे बंगले आणि इमारतींचे तोडकाम सुरू केल्याने व्यथीत झालेल्या कामगारांनी बेमुदत आंदोलन छेडले.

एनआरसी कामगार संघर्ष समिती नावाने समिती स्थापण करुन कामगार आपल्या संघर्षाला धार देत आहेत. या संघर्ष समितीतील सदस्य भा.ज.प, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, मनसे पक्षातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या लढ्याला सर्वपक्षीय रंग आला आहे. प्रत्येक सदस्य या लढ्यामागे आपल्या पक्षाची ताकद उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत आजपर्यंत पालकमंत्री एकनाथजी शिंदे, स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, मनसे आमदार मा. राजु पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रियाताई सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, अॅड. प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांना भेटून निवेदने दिली गेली आहेत. सर्वांनी आपण कामगारांच्याच बाजूने असून या बाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

आजपर्यंत स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, मनसे आमदार राजु पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, वंचित बहुजन अघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर आदी नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन अंदोलनकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आहेत. संघर्ष समितीतील सदस्यानी केन्द्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली असता आपण लवकरच कंपनी व्यवस्थापन आणि सध्याचे जमिनीचे मालक अदानींसोबत बरोबर बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू, असे अश्वासन दिले आहे. सर्वपक्षीय नेत्यांना साकडे घातले असून संघर्ष समितीच्या या चिवट लढ्याला लवकरच यश मिळेल असा आशावाद एन. आर. सी कंपनीचे तीन हजार कामगार व त्यांचा परिवार करत आहेत.

आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी एन.आर.सी कामगार संघर्ष समितीचे सदस्य असून पक्षीय राजकारण सोडून आमच्या आणि सहकारी कामगारांच्या न्याय हक्कासाठी खांद्याला खांदा देऊन संघर्ष करत आहोत. सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला आश्वस्त केल्यामुळे आमच्या लढाईला निश्चित यश मिळेल, याबाबत आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र तरीही आम्ही आमचा लढा या पुढे अधिक तीव्र करणार आहोत. जोपर्यंत यश पदरात पडत नाही तोपर्यंत हाल लढा असाच चालू राहणार.
– रामदास वळसे पाटील, संस्थापक सदस्य एन.आर. सी. कामगार संघर्ष समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -