घरदेश-विदेशसेवानिवृत्त जवानांसाठी पुढील आठवड्यापासून कोरोना लसीकरण, आरोग्य मंत्रालयाची माहिती

सेवानिवृत्त जवानांसाठी पुढील आठवड्यापासून कोरोना लसीकरण, आरोग्य मंत्रालयाची माहिती

Subscribe

अशा प्रकारे कोविन पोर्टलवर करा नोंदणी

लष्करी रुग्णालयात सुरक्षा दलातील सेवानिवृत्त जवान आणि अवलंबित सैनिकांना पुढील आठवड्यापासून कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सेवानिवृत्त जवानांना पुढील आठवड्यापासून कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. कोविन पोर्टलवर लष्करी रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १ आठवड्याचा कालावधी लागणार असून तसेच आगामी दिवसात मार्गदर्शक सुचना जारी करण्यात येणार आहेत.

देशात पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील लसीकरण सुरु आहे. यानंतर आता पुढील आठवड्यापासून सेवानिवृत्त जवानांना आणि अवलंबितांना (आश्रित) कोरोना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये डॉक्टर,आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांना लस देण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाव्हायरस साथीमुळे लोकांचा त्रास कमी करण्यासाठी सैन्य दलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोविड प्रभावित देश, चीन, इराण, इटली, मलेशिया यासारख्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सैन्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याशिवाय देशभरातील लोकांना मदत साहित्य पुरवण्यात सुरक्षा दलांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशभर राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये सशस्त्र दलाचे जवान आघाडीवर राहिले आहेत.

अशा प्रकारे कोविन पोर्टलवर करा नोंदणी

http://cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या
तुमचा मोबाईल नंबर सामायिक करा, यानंतर Get otp या ऑप्शनवर क्लिक करा
एसएमसद्वारे तुम्हाला एक कोड येईल
वेबसाईटवर ओटीपीच्या रकान्यात कोड टाकून verify वर क्लिक करा
ओटीपीची पडताळणी झाल्यावर रिजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशनवर योग्य माहिती सामायिक करा

- Advertisement -

अशी माहितीचा फॉर्म भरल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या रजिस्टर regisert या बटणावर क्लिक करा. तुमची नोंदी यशस्वी झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. यानंतर लसीकरणासाठीच्या तारखेसाठी अकाऊंट डिटेल्स पेजवर असणाऱ्या कॅलेंडर बटणावर क्लिक करा आणि Schedule Appointment वर क्लिक केल्यास तुम्हाला लसीकरण कधी करायचे आहे. याबाबत तारीख येईल. तुम्हाला पाहिजे त्या केंद्राची आणि वेळेची निवड करुन Book Appointment for Vaccination pageवर क्लिक करा.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -