घरमनोरंजनप्रियांकाशी लग्न करण्याचे निकने दिले मजेशीर कारण

प्रियांकाशी लग्न करण्याचे निकने दिले मजेशीर कारण

Subscribe

नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये निकने प्रियंकाशीच का लग्न केले याचे कारण सागितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि गायक निक जोनस यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहित आहे. हे क्यूट कपल अनेकदा एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. तसेच एकमेकांच्या पोस्टवर प्रेमळ कमेंटही करत असतात. गाला इव्हेंटपासून सुरु झालेली ही लव्हस्टोरी लग्नावर येऊन थांबली. २ डिसेंबर २०१८ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. प्रियांकाशी लग्न करण्याआधी निकने अनेक मुलींना डेट केले होते पण त्यातल्या कोणासोबतच लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला नव्हता. मग प्रियांकाशीच का लग्न केले? प्रियांकामध्ये असे काय खास होते ? याबाबत निकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK JONɅS (@nickjonas)

 या मुलाखतीत निकला त्याने आतापर्यंत ज्या मुलींना डेट केले त्या सर्वांमध्ये प्रियांका इतरांपेक्षा कशी वेगळी आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना निकने असे सांगितले की, लग्नाआधीच त्याच्या आणि प्रियांकाच्या मैत्रीबद्दल सांगितले ज्यामुळे त्यांच्यातील नाते अधिकाधिक दृढ हेत गेले. या कारणामुळे प्रियांका इतर मुलींपेक्षा वेगळी वाटली म्हणून निकने प्रियांकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

हे वाचा-अनुपम खेर यांनी घेतली कोरोना लस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -