घरक्राइमसंतापजनक! मुलाने कानशिलात मारल्याने आईचा जागीच मृत्यू

संतापजनक! मुलाने कानशिलात मारल्याने आईचा जागीच मृत्यू

Subscribe

तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या आईवर शुल्लक कारणासाठी मुलाने हात उगारल्याने आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. या विवाहीत मुलाने स्वत:च्या जन्मदात्या आईला रागाच्या भरात इतक्या जोरात कानाखाली दिली की यात वृद्ध आई जमीनीवर कोसळली. आणि काही वेळाने तिने प्राण सोडले आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरात सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ७६ वर्षांय अवतार कौर असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

बिंदापूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला परिसरात वाद सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर बिंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी राहणाऱ्या ३८ वर्षीय सुधारा नामक महिलेचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत पार्किंगवरून वाद झाला होता. मात्र या महिलेने वाद मिटल्याचे सांगितल्याने पोलीस निघुन गेले. यानंतर याच महिलेचे आणि तिच्या पतीचे ग्राउंड फ्लोअरला राहणाऱ्या वृद्ध महिलेसोबत पुन्हा वाद झाला. यावर वृद्ध महिला अवतार कौर यांचा मुलगा रणबीर याने आपल्या आईला या भांडणांबाबत विचारले. यावरुन आई आणि मुलामध्ये भांडण सुरु झाले. हे भांडण इतके वाढले की मुलगा रणबीरने रागाच्या भरात जन्मदात्या अवतार कौर या वृद्ध आईच्या जोरदार कानशिलात लागावली. यामुळे अवतार कौर जमिनीवर कोसळल्या. यावेळी कौर यांची सूनही तेथे उपस्थित होती. त्यांनतर मुलाने आणि सुनेने वृद्ध महिलेस तात्काळ रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी रुग्णालयात पोहचताच मृत घोषित केले. याप्रकरणी सीसीटीव्ही पुरवांसह कौर यांचा मुलगा रणबीर विरोधात पोलिसांनी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -