घरट्रेंडिंगZomato प्रकरण: तरुणी बंगळूर सोडून पळाली

Zomato प्रकरण: तरुणी बंगळूर सोडून पळाली

Subscribe

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर Zomato डिलिव्हरी बॉय कामराजने बंगळूरमध्ये राहणाऱ्या हितेशा चंद्राणी या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हितेशा चंद्राणी हीने स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर मारहाण केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र या आरोपांचे खंडण करत Zomato डिलिव्हरी बॉय कामराज योग्य असून त्याला Zomato वर ग्राहकांनी त्याला हायरेटींग देखील दिला आहे. असे Zomatoने सांगितले. यानंतर आता Zomatoडिलिव्हरी बॉयवर आरोप करणारी महिला हितेशा ही बंगळूर सोडून गेल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणावर कामराज स्पष्टीकरण देताना म्हणाला, मी तिला मारहाण केली नाही तर तिनेच माझ्यावर चप्पल उगारुन मारहाण करण्यास सुरुवात केली. मी तिला रोखण्याचा प्रयत्न करत असतांना तिच्या हातातील अंगठी तिच्या नाकाला जोरात लागली, त्यामुळे तिला दुखापत झाली असावी. हितेशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कामराजला अटक केली होती. मात्र कामराज आता जामीनावर सुटून बाहेर आला आहे. यानंतर कामराजने हितेशा चंद्राणीच्याविरोधात बंगळूर पोलिसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

या प्रकरणातील चौकशीसाठी बंगळूर पोलिसांनी हितेशाला नोटीस बजावली. मात्र हिताशा सध्या बंगळूरमध्ये नसल्याचे समोर येत आहे . या प्रकरणात हिताशाच्या घराचा पत्ता सोशल मीडियावर शेअर झाल्यामुळे काही दिवसांसाठी हितेशा बंगळुर शहर सोडून गेली आहे. ती बंगळूर सोडून महाराष्ट्रात मावशीकडे राहण्यासाठी गेली आहे, अशी माहीती हितेशाने पोलिसांना दिली आहे. हितेशा परत आल्यावर आम्ही दोन्ही बाजू ऐकूण यातील मुख्य गुन्हेगार आरोपीसमोर आणू तसेच जर हितेशा बंगळूरमध्ये परतली नाही तर तिला अटक करु, असे पोलिसांनी सांगितले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -