घरमनोरंजनमाधुरी दीक्षितच्या 'डान्स दिवाने' च्या सेटवर तब्बल १८ जणांना कोरोनाची लागण

माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दिवाने’ च्या सेटवर तब्बल १८ जणांना कोरोनाची लागण

Subscribe

माधुरी दीक्षितच्या डान्स दीवाने या रिअॅलिटी शोचे धुमधडाक्यात ग्रॅण्ड ओपनिंग करण्यात आले होते.

जगभरासह मुंबईतही कोरोनाचे रुग्ण दिवंसेदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाचे सावट सर्वसामान्यांपासून अगदी मोठमोठ्या लोकांनापर्यंत पसरले आहे. दरम्यान, टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘डान्स दीवाने’ च्या सेटवर तब्बल १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कार्यक्रमाचा तिसरा सीजन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी नृत्याअविष्कार दाखवून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते. माधुरी दीक्षितच्या डान्स दीवाने या रिअॅलिटी शोचे धुमधडाक्यात ग्रॅण्ड ओपनिंग करण्यात आले होते. मात्र या नुकत्याच सुरु झालेल्या रिअॅलिटी शोच्या आनंदावर विरजन पडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

कोरोना प्रादुर्भावाने ग्रासलेल्यांची संख्या डान्स दीवानेच्या सेटवर जास्त आहे. यामुळे सेटवरील सर्वच कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय परीक्षकांमध्ये म्हणजेच, माधुरी दीक्षित, धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया यांमध्येसुद्धा भीतीचे वातावरण आहे. कोरोना झालेल्या टीमच्या १८ सदस्यांच्या बदली दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. असा कठोर निर्णय कार्यक्रमाचे निर्माते अरविंद राव यांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यक्रमावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. अरंविद राव म्हणाले की, हे जे काही झाले ते वाईट आहे. आम्ही प्रार्थना करतो की, ते सगळे लवकरात लवकर बरे व्हावे. कार्यक्रमाचे पुढील चित्रीकरण ५ एप्रिलला असून, त्यापूर्वी सर्व स्पर्धक आणि इतर सदस्यांची चाचणी करून घेतो.


हेही वाचा – मोठी बातमी! परमबीर सिंग यांच्या आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -