घरदेश-विदेशअफगाणिस्तानमध्ये हल्ला; ६८ जणांचा मृत्यू, १२८ जखमी

अफगाणिस्तानमध्ये हल्ला; ६८ जणांचा मृत्यू, १२८ जखमी

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये ६८ नागरिकांचा मृत्यू तर १२८ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या ननगरहार प्रांतामध्ये मंगळवारी आंदोलनकर्त्यांना लक्ष्य करत आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्लायामध्ये ६८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर १२८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.

- Advertisement -

६८ नागरिकांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या ननगरहार प्रांतामध्ये स्थानिक नागरिक एका पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाविरोधात आंदोलन करत होते. शेकडो नागरिकांचे मोहम्मद दारा जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरु होते. आंदोलना दरम्यान अचानक आत्मघाली हल्ला झाला. या हल्लायमध्ये ६८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या १२८ नागरिकांना उपचारासाठी जलालाबाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेक नागरिकांची प्रकृती गंभीर आहे.

हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली नाही

ईदच्या दरम्यान अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबानच्या दहशतवादी संघटना यांच्यामध्ये युध्द सुरु झाले. यानंतर देशामध्ये दहशतवादी हल्ले वाढायला सुरुवात जाली. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शकडो नागरिक आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये २२ जुलैला दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच दिवशी काबूलच्या हामिल करजई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यामध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला तर ६० नागरिक जखमी झाले होते. या हल्ला दरम्यान सुदैवाने राष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम वाचले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -