घरट्रेंडिंगWork From Homeमुळे मान व पाठीच्या दुखण्याने हैराण, करायचं तरी काय?

Work From Homeमुळे मान व पाठीच्या दुखण्याने हैराण, करायचं तरी काय?

Subscribe

कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करत असताना ४६ टक्के लोकांना पाठिच्या आणि मानेच्या दुखण्याला समोरे जावे लागत आहे.

कोरोना महामारीच्या काळात गेली वर्षभर अनेक जण घरुन काम ( Work From Home) करत आहेत. अनेक कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी वर्क फ्रॉम होम सुरु ठेवले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी आपण घरी राहून काम करतो. मात्र वर्क फ्रॉम होम करत असताना लोकांना आरोग्याविषयक अनेक समस्या सतावू लागल्या आहेत. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या जवळपास अर्ध्याहून अधिक लोक मान आणि पाठीच्या दुखण्यामुळे चिंतेत आहेत. एका संशोधनात असे समोर आले आहे की, कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करत असताना ४६ टक्के लोकांना पाठिच्या आणि मानेच्या दुखण्याला समोरे जावे लागत आहे.

अनेक कर्मचारी असे आहेत की जे घरी असलेल्या फर्निचरचा वापर करुन काम करतात. तर काही कर्मचारी हे ऑफिसमध्ये असणाऱ्या फर्निचरचा वापर करतात.  केवळ ४ टक्के कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी फर्निचर पुरवते. त्यामुळे बसण्याच्या क्रियेत मोठा फरक निर्माण झाला आहे. म्हणून वर्क फ्रॉम होम करत असताना तुम्हा कुठे बसून काम करता, कोणत्या पोझिशनमध्ये काम करता हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

चिरोप्रॅटीक्स क्लिनिकल डायरेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे लोकांमध्ये पाठदुखी आणि मानदुखीच्या त्रासांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे काम करताना एर्गोनॉमिकली डिझाईन केलेल्या खुर्च्यांचा वापर करणे त्याचप्रमाणे संगणकाची स्क्रिन योग्य उंचीवर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मानदुखी आणि पाठदुखी काय उपाय कराल?

  • मानदुखी आणि पाठदुखी कमी करण्यासाठी नियमित योग्य व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • फिजिओथेरपीचा वापर करुन तुम्ही मानदुखी आणि पाठदुखी कमी करु शकता.
  • काम करायला बसताना योग्यरित्या बसा. तुमची कंप्युटर स्क्रिन ठरावीक उंचीवर ठेवा.
  • ऑफिसमध्ये ज्याप्रमाणे काम करताना जसे बसता त्याप्रमाणे घरी काम करतानाही बसण्याचा प्रयत्न करा.

    हेही वाचा – Lockdown: दाढी वाढवणाऱ्यांसाठी महत्वाचा Alert! मास्क खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्याच

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -