घरताज्या घडामोडीLive Update: पुण्यात २४ तासांत ९,८१० कोरोना रुग्णवाढ, १३७ जणांचा मृत्यू

Live Update: पुण्यात २४ तासांत ९,८१० कोरोना रुग्णवाढ, १३७ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ८१० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १० हजार ३१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ७३ हजार ००४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार १९ जणांचा मृत्यू झाले असून ६ लाख ५९ हजार ८७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार ८३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७३ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६३ हजार २५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा

- Advertisement -

नागपुरात गेल्या २४ तासांत ७ हजार ४८५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८२ जणांच्या मृत्यू नोंद झाी आहे. तर ६ हजार ५३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता नागपुरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५८ हजार ४१८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६ हजार ७६७ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ७८ हजार ३०२ कोरोनामुक्त झाले आहेत.


गोव्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४२० रुग्ण आढळले असून १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ५९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या गोव्यात ११ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


ठाण्याचे माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांचे आज एका खासगी रुग्णालयात निधन.


ठाण्यातील महानगरपालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटल कोविड सेंटर येथे रुग्णाच्या नातेवाईक लाखो रुपये घेऊन बेड उपलब्ध करून दिल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करून मनपा आयुक्त यांना या संदर्भात पुरावे सादर करण्यात आले होते. आयुक्तांनी चौकशी करून वेळ पडल्यास गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले होते..
मनपा अधिकाऱ्याच्या चौकशीत पैसे घेऊन बेड दिल्याचा प्रकार उघडकीस येताच शुक्रवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. कापूरबावडी पोलिसनी दोन डॉक्टर, कोविड सेंटर प्रभारी अधिकारीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विरार रुग्णालय अग्निकांड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दुःख

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या करोना रुग्णांच्या मृत्युबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. विरार येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून काही करोना रुग्णांचा मृत्यु झाल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोकसंवेदना कळवतो व जखमी रुग्णांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.


कोरोना बाधितांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल माध्यमातून बैठक घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९ वाजता कोविड-१९ मुद्द्यावरुन आणखी एक बैठक घेणार आहेत. तसेच १० वाजता ते कोरोनासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.


विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांबद्दल व्यक्त केल्या सहवेदना

विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. यासह मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमीना ५० हजारांची मदत. पण राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदतीची घोषणा नाही.


विरार रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांची घोषणा

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे


विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागाला आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शुक्रवारी पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान भीषण आग लागली.यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. तर अतिदक्षता (ICU) विभागात जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -