घरफिचर्सऑक्सिजन देता का ऑक्सिजन

ऑक्सिजन देता का ऑक्सिजन

Subscribe

मरणासन्न झालेल्या व्यवस्थेला
सतत नवे आदेश काढणाऱ्या प्रशासनाला
टीव्हीवरच झळकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना
ऑक्सिजन देता का ऑक्सिजन?

रुग्णांना क्षणाक्षणाला वाहून नेणाऱ्या ॲम्ब्युलन्स चालकांना
थकलेल्या डॉक्टर्संना, नर्सेसना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना
स्मशानभूमीत दिवसरात्र राबणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना
ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!!

- Advertisement -

वाचाळ बडबड करणाऱ्या विरोधकांना
अक्राळ-विक्राळ भीती निर्माण करणाऱ्या माध्यमांना
व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अगाध ज्ञान देणाऱ्यांना
ऑक्सिजन देता का ऑक्सिजन?

लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्यांना
घरी राहून संसार उदध्वस्त झालेल्यांना
हातावरलं पोट असलेल्या श्रमिकांना
प्रॉफीट गमावेल्या व्यापाऱ्यांना
ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!!

- Advertisement -

अज्ञात शत्रूविरुद्ध युद्ध लढणाऱ्या पोलिसांना
घरदार विसरून मदतीसाठी पुढे आलेल्या सेवकांना
ग्राऊंडवर पुन्हा जाण्यासाठी आसुसलेल्या निष्पापांना
ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!!

आप्पे पात्रातील पाव, कढईतले केक आणि दालगोना कॉफी करणाऱ्यांना
लॉकडाऊनमध्ये कसकसले ऑनलाईन क्रॅश कोर्स सुरू करणाऱ्यांना
सोशल मीडियावर लाईव्ह येऊन फुकटचे सल्ले देणाऱ्यांना
ऑक्सिजन देता का ऑक्सिजन 🙂

हे ही दिवस सरतील या आशेवर बसलेल्यांना
पुन्हा मित्र-मैत्रिणींना कडकडीत मिठी मारता येईल असं वाटणाऱ्यांना
हॉटेलमध्ये निवांत बसून कट्ट्याची स्वप्न रंगवणाऱ्यांना
आणि
‘जग कोरोनामुक्त’ अशी बातमी वाचण्यासाठी अधीर झालेल्यांना…
ऑक्सिजन द्यायलाच हवा हो ऑक्सिजन!!!!!!


विश्वनाथ गरुड
लेखक हे डिजिटल मिडिया तज्ज्ञ आणि सोशल मिडिया अभ्यासक आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -