घरदेश-विदेशऑक्सिजनबाबत सुप्रीम कोर्टाने केले मुंबई महापालिकेचे कौतुक

ऑक्सिजनबाबत सुप्रीम कोर्टाने केले मुंबई महापालिकेचे कौतुक

Subscribe

सुप्रीम कोर्टाने बुधवारी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेने याच संदर्भात फार कौतुकास्पद काम केले आहे. आम्ही दिल्लीतील व्यवस्थापनाचा अपमान करत नाही. मात्र, मुंबई महानगरपालिकेने काय केले याचा आपल्याला अभ्यास करता येईल. महाराष्ट्रसुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करणारे राज्य आहे, असे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

दिल्लीसोबतच अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचसंदर्भात बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भात केंद्र सरकारला आदेश देऊनही केंद्राने त्याची दखल न घेतल्यासंदर्भात दिल्ली हायकोर्टाचा अवमान केल्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर सुनावणी झाली. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.

- Advertisement -

न्या. चंद्रचूड यांना मुंबई महापालिकेने केलेल्या कामासंदर्भात प्रसारमाध्यमांद्वारे माहिती मिळाली. तसे काही देश स्तरावर आणि राज्य स्तरावर शक्य आहे का याची चाचपणी करण्याची गरज आहे असे मत कोर्टाने व्यक्त केले. इतकेच नाही मुंबई महापालिकेचा हा संदर्भ देशामध्ये आणि राज्यांमध्ये कशा पद्धतीने कोरोना नियंत्रणामध्ये आणता येईल, या संदर्भातील भाष्य करताना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -