घरताज्या घडामोडीFact Check: आरोग्य मंत्रीच दिसले विनामास्क, निमित्त बंगाल हिंसाविरोधी आंदोलनाचे, जाणून घ्या...

Fact Check: आरोग्य मंत्रीच दिसले विनामास्क, निमित्त बंगाल हिंसाविरोधी आंदोलनाचे, जाणून घ्या सत्य

Subscribe

सोशल मीडियावर आरोग्यमंत्री विनामास्क आंदोलन करत असल्याचा फोटो मोठ्या प्रमाणात वायरल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. विधानसभा निवडणूकीत टीएमसीने आपले वर्चस्व कायम ठेवत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु निवडणूकीच्या निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे. पश्चिम बंगालमध्ये विविध भागात हिंसाचा झाला असून भाजप कार्यालयांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री वी मुरलीधरन यांच्याही ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याचे खापर भाजपने तृणमूल काँग्रेसवर फोडले आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला विरोध दर्शवण्यासाठी भाजपने ५ मे रोजी देशव्यापी आंदोलन केले होते. यामध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा विनामास्क आंदोलन करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे. यामुळे आरोग्यमंत्र्यांवर नेटकऱ्यांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे.

काय आहे प्रकरण

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या हिंसाचाराला भाजपकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासाठी तृणमूल काँग्रेस आणि बंगाल हिंसाचाराला विरोधा करण्यासाठी भाजपने देशव्यापी आंदोलन केले होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन विनामास्क आंदोलन करत असल्याचे दिसत आहे. असा एक फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

- Advertisement -

फोटोतील चित्र सत्य की असत्य

सोशल मीडियावर आरोग्यमंत्री विनामास्क आंदोलन करत असल्याचा फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या फोटो दिसत आहे की, आरोग्यमंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते गर्दी करुन टीएमसीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या हातात लोकशाही वाचवा, बंगाल वाचवा असे लिहिलेले बॅनर आहेत. तसेच सर्वांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसते आहे. तसेच सर्वजण आपल्या तोंडावर बोट ठेवून शांत बसले असल्याचे दिसते आहे. अँटी फेक न्यूज रुम वॉर (AFWA) ने दिलेल्या माहितीनुसार हा फोटो खोटा असून जूना फोटो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा मे २०२१९ मधला आहे. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि इतर भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसेच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा फोटो शेअर करत एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ही आहे देशाची व्यवस्था, मध्यभागी बसलेला माणूस या देशाचा आरोग्यमंत्री आहे. साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी लोकांना वाचवण्यासाठी कारावई करायची होती ते स्वतः आंदोलन करत आहे. बंगालमधील पराभव स्विकारता येत नसल्यामुळे बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावा यासाठी विनामास्क आंदोलन करत आहेत. देशात रोज ऑक्सीजन आणि औषधांच्या तुटवड्यामुळे ३००० ते ३५०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे परंतु यांना दिसत नाही आहे. कारण यांना फक्त आपल्या खुर्चीची चिंता आहे. जनता नरकात जाईना. असे ट्विट एका नेटकऱ्याने केला असल्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

कसे कळाले सत्य

फोटोमागचा खरा ठावठिकाणा शोधताना एका न्यूज वेबसाईटवरील बातमीमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या आंदोलनाचा फोटो सापडला आहे. त्या बातमीनुसार १४ मे २०२१९ मध्ये कोलकातामध्ये अमित शाह यांचा रोड शो झाला होता. या रोड शोमध्ये अमित शाह यांच्या ताफ्यावर जमावाने दगडफेक केली होती. या हिंसेचे खापर टीएमसीवर फोडण्यात आले होते. या हिंसेचा विरोध दर्शवण्यासाठी भाजप नेत्यांनी आंदोलन पुकारले होते. दिल्लीतही भाजप नेत्यांनी आंदोलन केले होते यावेळी त्या आंदोलनात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, निर्मला सितारामण अणि इतर नेते उपस्थित होते. एनआयए वृत्तसंस्थेनेही तेव्हा हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसारित केला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -