घरताज्या घडामोडीCoronavirus new symptoms: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नवी लक्षणे वाचा

Coronavirus new symptoms: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नवी लक्षणे वाचा

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट खूप भयावह आहे. कोरोनाबाधितांप्रमाणे मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेगवेगळी लक्षणे समोर आली आहेत. यामुळे अनेक लोकांना लक्षणे समजून येत नाही आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. एम्सचे (AIIMS) पल्मोनरी मेडिसीन विभागाचे प्रोफेसर डॉक्टर विजय हुड्डाने ट्वीटवर कोरोनाचे काही नवीन लक्षणांबाबत माहिती दिली आहे. ही लक्षणे ओळखून वेळेवर उपचार सुरू केले जाऊ शकता.

डॉक्टर हुड्डा म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ताप, श्वास घेण्यास अडचण येणे किंवा इतर लक्षणे असलेले रुग्ण ५ ते ७ दिवसांत ठीक होत होते. या लाटेमध्ये रुग्णांमध्ये १० दिवसांपर्यंत ताप राहतो.

- Advertisement -

काय आहे कोरोनाची नवी लक्षणे?

ताप, घसा खराब होणे, सर्दी, शरीर-स्नायू दुखणे आणि थकवा यासारख्या सामान्य लक्षणांव्यतिरिक्त या लाटेत काही इतर लक्षणे दिसली आहेत. अतिसार, ओटीपोटात दुखणे, शरीर दुखणे, उलट्या होणे, लकवा आणि हृदयविकाराचा झटका यासारखे नवीन लक्षणे दिसून आली आहेत.

पुढे डॉक्टर हुड्डा म्हणाले की, गेल्या एका वर्षापासून आपण पाहतोय की, कोरोना कोणत्याही रुपात समोर येऊ शकतो. रुग्णांना काही नवे जाणवत असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांकडे जावे. काहीही नवीन आणि विचित्र जाणवू लागले कोरोना लक्षण असल्याचे मानून चालले पाहिजे. तुम्ही ऐकूण हैराण व्हाल की, डोळे लाल होणे पण कोरोनाचे लक्षण असू शकते. लोकं याकडे इंफेक्शन म्हणून दुर्लक्ष करतात परंतु हे कोरोनाचे कारण असू शकते.

- Advertisement -

सध्याच्या काळात डॉक्टरांनी वेगवेगळ्या लक्षणांना कोरोनाची लक्षणे म्हणून मानले पाहिजे आणि रुग्णांला त्वरित कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला पाहिजे. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार रुग्णांवर उपचार सुरू केले पाहिजे, असे डॉक्टर हुड्डा म्हणाले.

नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के.पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर फक्त डोके दुखी किंवा शरीर दुखत आहे तर हे पण कोरोनाचे लक्षण असू शकते. कोरोनाची काही सामान्य लक्षणे आहेत जे माहिती अभावी खूप लवकर गंभीर होतात. त्यामुळे अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

सुगंध न येणे, चव बिघडणे – कोरोना विषाणूचे सर्वात अजब लक्षण म्हणजे सुगंध न येणे आणि चव बिघडणे. मेडिकल भाषेत एनोस्मिया म्हटले जाते. काही लोकांना ताप येण्यापूर्वी जे जावणते, तर काही लोकांना फक्त हिच लक्षणे दिसतात. ज्या लोकांचा फक्त सुगंध आणि चव यामध्ये समस्या होते त्यांना ठीक होण्यासाठी ६ ते ७ आठवडे लागतात.

घशात खवखव – घशात खाज आणि खवखव जाणवणे म्हणजे घशात सूज येण्याचे संकेत असतात. कोरोना रुग्णात हे सामान्य लक्षण आहे. देशभरात जवळपास ५२ टक्के लोकांना कोरोनाच्या लक्षणांमध्ये घशात खवखव झाली आहे. काही लोकांच्या घशात जळजळ होते ती खाण्यापिण्यामुळे आणखी वाढते.

खूप जास्त कमकुवतपणा आणि थकवा येणे – नव्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांमध्ये खूप जास्त कमकुवतपणा आणि थकवा जाणवतो. हे कोरोनाचे सुरुवातीचे लक्षणे असून शकते. याला साधारण व्हायरल इंफेक्शन समजण्याची चूक करू नका.

थंडी वाजण्यासह ताप येणे – खूप जास्त थंडी वाजण्यासह ताप येण्याचा अर्थ असू शकतो की, तुम्ही व्हायरसच्या संपर्कात आला आहात. कोरोनाचे हे लक्षण पहिल्या लाटेमध्येही होते आणि हे लक्षण दुसऱ्या लाटेतही आहे. याशिवाय स्नायू आणि सांधे दुखी हे एक लक्षण आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -