घरमनोरंजनआरती सिंगला लस घेताना व्हिडिओ काढणे पडले महाग

आरती सिंगला लस घेताना व्हिडिओ काढणे पडले महाग

Subscribe

इतकी ओवरअॅक्टिंग करू नका. खूप विचित्र दिसत आहे. तसेच लोक विचारत आहेत व्हिडिओग्राफर तुम्ही स्वत:घेऊन जात आहात की रुग्णालयात याचा बंदोबस्त आधीच केला आहे.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून अनेक कलाकारांनी देखील या सुविधेचा लाभ घेतला आहे. तसेच लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी सोशल मीडियावर कोरोना लसीचा डोस घेत असताना फोटो शेअर करत आहेत. तसेच या फोटो सेशन मुळे अनेक कलाकारांना ट्रोल देखील केले जात आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिव्या कुमार खोसला हिला लसीकरणा दरम्यान मास्क न घातल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता अशाच एका टीव्ही अभिनेत्री आरती सिंग हिचा व्हॅक्सिन घेत असताना एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये आरती व्हॅक्सिन घेताना इंजेक्शनला प्रचंड घाबरत आहे असे दिसत आहे. आरतीला तिचा व्हिडिओ चांगलाच भोवला असल्याचे दिसत आहे. नेटकर्‍यांना आरती सिंगची अॅक्टिंग काही पचणी पडली नसल्याचे त्यांच्या कमेंट वरुण लक्षात येत आहे. आरतीच्या व्हिडिओमुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी तिला कुत्रा चावला आहे का ? अशी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Latest Bollywood (@lates_tupdate)

- Advertisement -

इतकेच नाहीतर अभिनेत्री अशा नेगी हिने सुद्धा अनेक कलाकारांना लसीकरण करताना केलेल्या फोटोशूटवर टोला लगावला आहे. अशा ने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करून लिहले आहे की,” सगळे कलाकार लसीकरण करताना फोटो अपलोड करत आहेत. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यापर्यंत ठीक आहे. पण कृपया इतकी ओवरअॅक्टिंग करू नका. खूप विचित्र दिसत आहे. तसेच लोक विचारत आहेत व्हिडिओग्राफर तुम्ही स्वत:घेऊन जात आहात की रुग्णालयात याचा बंदोबस्त आधीच केला आहे.” अशा मजेशीर अंदाजात अशा नेगीने ओवरअॅक्टिंग करणार्‍या लोकांना फटकारले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MsNegi (@ashanegi)

- Advertisement -

हे हि वाचा – मी एकदम ठणठणीत आहे, निधनाच्या अफवेवर,मुकेश खन्ना यांचे उत्तर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -