घरताज्या घडामोडीCorona Vaccine: कोरोनाच्या सर्व नव्या स्ट्रेनवर Covaxin असरदार - ऑक्सफर्ड जर्नल

Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व नव्या स्ट्रेनवर Covaxin असरदार – ऑक्सफर्ड जर्नल

Subscribe

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यादरम्यान अनेक कोरोनाचे नवे स्ट्रेन आढळताना दिसत असून अजूनच चिंता वाढत आहे. पण कोव्हॅक्सिन लस कोरोना व्हायरसच्या सर्व नव्या स्ट्रेन असरदार असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. यामध्ये भारताचा, ब्रिटनच्या अशा अनेक स्ट्रेनचा समावेश आहे. पीअर-रिव्यूड मेडिकल जर्नल क्लिनिकल इंफेक्शियस डिसीजमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात देखील याबाबत नमूद करण्यात आले आहे.

ऑक्सफोर्ड जर्नलमध्ये दिलेल्या अभ्यासाच्या हवालातून भारत बायोटेकच्या सहव्यस्थापकीय संचालक सुचित्रा ईला यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस ही कोरोनाच्या सर्व नव्या स्ट्रेनवर परिणामकारक आहे. यामध्ये डबल म्युटंट B.1.617 आणि B.1.1.7 याचा समावेश आहे, जो सर्वात पहिल्यांदा भारत आणि ब्रिटनमध्ये आढळला होता, अशी सुचित्रा ईला यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी हे ट्वीट पंतप्रधान कार्यलय, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरला टॅग केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान भारत बायोटेकने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संशोधन विभाग यांच्या माध्यमातून या स्ट्रेनवर सखोल अभ्यास केला. कोव्हॅक्सिन ही तीन लसीपैकी एक आहे, ज्या लसीला भारतात आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. याशिवाय सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि रशियाची स्पुटनिक व्ही लस आहे. देशात आतापर्यंत १८ कोटी लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: भारतात स्पुटनिक लाईटला मंजुरी अपेक्षित, Sputnik V लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -