घरक्रीडाAsian Boxing Championship : भारताच्या हुसामुद्दीनची झुंज अपयशी; वर्ल्ड चॅम्पियनच्या हातून पराभूत

Asian Boxing Championship : भारताच्या हुसामुद्दीनची झुंज अपयशी; वर्ल्ड चॅम्पियनच्या हातून पराभूत

Subscribe

हुसामुद्दीनला उझबेकिस्तानच्या मिर्झाहालीलोव्हने १-४ असे पराभूत केले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारताच्या मोहम्मदहुसामुद्दीनचे आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद (Asian Boxing Championship) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मंगळवारी झालेल्या ५६ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हुसामुद्दीनला उझबेकिस्तानच्या विश्वविजेत्या मिराझीझबेक मिर्झाहालीलोव्हने १-४ असे पराभूत केले. गतविजेत्या मिर्झाहालीलोव्हला हुसामुद्दीनने चांगली झुंज दिली. हुसामुद्दीनने जोरदार प्रतिहल्ला केला. परंतु, विश्वविजेत्या आणि एशियाड सुवर्णपदक विजेत्या मिर्झाहालीलोव्हने मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ केला. त्याने पायाचा चांगला वापर करत आणि हुसामुद्दीनला समोरच्या बाजूने मुक्के मारत अखेर ही लढत जिंकली.

सांगवानचेही आव्हान संपुष्टात

हुसामुद्दीनप्रमाणेच भारताच्या सुमित सांगवानचेही आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ८१ वजनी गटात इराणच्या मेयसाम घेस्लाघीने सांगवानवर मात केली. बुधवारी भारताचा स्टार बॉक्सर अमित पांघल (५२ किलो) या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळेल. जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितपुढे मंगोलियाच्या खारखु एनखमांडखचे आव्हान असेल.

- Advertisement -

विकास, आशिषचा सलामीचा सामना

दुसरीकडे विकास कृष्णन (६९ किलो) आणि आशिष कुमार (७५ किलो) हे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले बॉक्सरही बुधवारी या स्पर्धेतील आपला सलामीचा सामना खेळतील. मागील आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या आशिषचा सामना जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अबिलखान अमानकुलसोबत होईल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -