घरCORONA UPDATEदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला 'डेल्टा' व्हेरियंटचं जबाबदार, संशोधकांचा दावा

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ‘डेल्टा’ व्हेरियंटचं जबाबदार, संशोधकांचा दावा

Subscribe

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. यातच कोरोनाचे अनेक नवनवे घातक व्हेरियंट समोर येत आहेत. याचत एका संशोधनात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रसारास डेल्टा व्हेरियंट जबाबदार असल्याचे समोर आले आहे. हा व्हेरियंट अल्फा व्हेरियंटपेक्षाही अधिक INSACOG द्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यामुळे कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट आता देशासाठी चिंतेचा विषय बनत आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत डेल्टा कोरोना विषाणूबाधित रुग्णसंख्या ही १२ हजारांहून अधिक आहे. INSACOG या संस्थेद्वारे करण्यात आलेल्या संशोधनात ही माहिती उघड झाली आहे. भारतातील जीनोम अनुक्रमण करणाऱ्या प्रयोगशाळांचा . INSACOG एक समूह आहे.

अल्फापेक्षा डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक

डेल्टा (B.1.617.2) अल्फा (B.1.1.7) पेक्षा ५० टक्के वेगाने पसरतो. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे लस घेतल्यानंतरही डेल्टा या कोरोना व्हेरियंटची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या अल्फा व्हेरियंटबद्दल सांगायचे झाल्यास, लसीकरणानंतर कोणत्याही व्यक्तीस अल्फा व्हेरियंट कोरोना व्हेरियंटची लागण झालेली नाही.

- Advertisement -

प्रत्येक राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत डेल्टा व्हेरियंटने सर्व व्हेरियंटला मागे टाकत असून सध्या देशातील कोरोना व्हेरियंटमधील सर्वाधिक सक्रिय व्हेरियंट म्हणून डेल्टा व्हेरियंटचे नाव समोर येत आहे. देशातील एकूण २९ हजार जीनोम अनुक्रमात, १ हजाराहून अधिक प्रकरणे डेल्टा व्हेरियंटी नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत या प्रकारातील १२ हजार २०० हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. हा प्रकार देशातील सर्व राज्यात अस्तित्त्वात आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे.


फेसबुकचा मोठा निर्णय, राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर स्पेशल ट्रिटमेंट होणार बंद


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -