घरदेश-विदेशcorona mutation : सौदी अरेबियाकडून लवकरचं 'हज यात्रा २०२१' ची होणार घोषणा

corona mutation : सौदी अरेबियाकडून लवकरचं ‘हज यात्रा २०२१’ ची होणार घोषणा

Subscribe

६० वर्षावरील नागरिकांना यात्रेस परवानगी नाही 

जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवा आहे. परंतु अनेक देशांमध्ये सध्या लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. यात गेल्या वर्षी करोनामुळे ऐनवेळी हज यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाही कोरोनाच्या सावटामुळे यंदाही हज यात्रा रद्द होण्याची शक्यता होती. परंतु यंदाची हज यात्रा होणार असल्याचे सौदी अरेबिया प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. सौदी अरेबिया शासनाने जगभरातून ४५ हजार जणांना हज यात्रेची परवानगी दिली आहे. यावर सौदी अरेबियाचे अर्थमंत्री माजिद अल- कासाबी यांनी सांगितले की, सौदी अरेबियामध्ये कोरोना लस घेतलीच पाहिजे असे बंधन नाही. परंतु कोरोना विषाणुचे नवनवे स्ट्रेन आणि लससंदर्भातील अनिश्चितता पाहता यंदा हज यात्रेसंदर्भातील आराखडा जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे सांगितले आहे.

हज यात्रेस जाणाऱ्यांना लस घेणे बंधनकारक

रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत अर्थमंत्री माजिद अल- कासाबी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी असेही स्पष्ट केले की, सौदी अरेबियामध्ये आत्तापर्यंत ४० टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे जर आपल्याला एकत्र राहायचे असल्यास, बाजारपेठेत, शाळेत, कामावर जायचे असल्यास लस घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत देशात सुमारे दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

लसीकरण मोहिमेत अडथळा 

जगात कोरोना विषाणूचे बदले स्वरूप आणि बहुतेक राज्यांमधील लसीकरण पुरवठ्यात होणार विलंब पाहता यंदा हज यात्रेचे स्वरुप कसे असे याची घोषणा करण्यास उशीर होत आहे. परंतु आरोग्य आणि हज मंत्री लवकरचं यंदाच्या हज यात्रेचे स्वरुप जाहीर करती असेही अल-कसाबी यांनी यांनी स्पष्ट केले.

६० वर्षावरील नागरिकांना यात्रेस परवानगी नाही 

यंदाच्या हज यात्रेसाठी देशातून ४,५०० च्या जवळपास तर महाराष्ट्रातून पाचशे हाजी यंदा हजला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदाच्या नियमांनुसार ६० किंवा त्या पुढील वयाच्या हाजींना यात्रा करता येणार नाही. यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. १८ ते ५९ वयोगटातील हाजींना परवानगी देण्यात आली आहे. परंतु इच्छुकांना फायझरची बायोटेक, ऑक्सफर्डची अॅस्ट्राझेनेका (कोव्हिशिल्ड), मारडेना किंवा जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या चारपैकी कोणत्याही एका लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरच हज यात्रेला जाता येणार आहे. याशिवाय गेल्या सहा महिन्यांत आजारी असणाऱ्या हाजींनाही हजला जाता येणार नसल्याची माहिती केंद्रीय हज समितीकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आता कोव्हिशील्डसह Sputnik V लस होणार तयार, रशिया देणार लस विकसिकरणाचे तंत्र


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -