घरटेक-वेकIncome Taxची नवीन वेबसाइट क्रॅश, Infosys वर भडकल्या अर्थमंत्री निर्मला सितारमण

Income Taxची नवीन वेबसाइट क्रॅश, Infosys वर भडकल्या अर्थमंत्री निर्मला सितारमण

Subscribe

अर्थमंत्र्यांनी ट्विट करत इन्फोसिस कंपनीला चांगलेच धोरेवर धरले

इनकम टॅक्सची नवीन वेबसाइट e-filing potal 2.O ८ जून रोजी लाँच करण्यात आली. मात्र ही वेबसाइट लाँच होताच त्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. इनकम टॅक्सच्या नवीन वेबसाइटबाबत लोकांच्या तक्रारी येत आहेत. वेबसाइट ओपन होत नसल्याचे अनेकांनी ट्विवर लिहिले आहे. याची थेट तक्रार अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यापर्यंत पोहचली. नवीन वेबसाइट क्रॅश झाल्याच्या अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी वेबसाइट तयार करणऱ्या इन्फोसिस (Infosys )कंपनीला चांगलेच फटकारले आहे. यासंदर्भात अर्थमंत्र्यांनी ट्विट करत इन्फोसिस कंपनीला चांगलेच धोरेवर धरले आहे. (New Income Tax website e-filing potal 2.O crashes, Finance Minister Nirmala Sitharaman erupts on Infosys)


‘इन्फोसिसने ही वेबसाइट तयार केली आहे. त्याची देखरेख करण्याचे कामही त्यांचेच आहे. e-filing potal 2.O हे पोर्टल काल रात्री ८:४५ वाजता सुरु करण्यात आले. पोर्टल लाँच होताच मला अनेक तक्रारी येऊ लागल्या. माझ्या टाइमलाईनवरही अनेक तक्रारी येणे सुरु झाले. मला आशा आहे की इन्फोसिस आणि नंदन निलेकणी सेवांच्या गुणवत्तांना घेऊन आमच्या करदात्यांना निराश करणार नाहीत. करदात्यांसाठी Ease in compliance ही आमची प्राथमिकता आहे’,असे म्हणत अर्थमंत्र्यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांना हे ट्विट टॅग केले आहे.

- Advertisement -

e-filing potal 2.O या नवीन पोर्टलवर करदात्यांसाठी स्वतंत्र कॅटेगरी देण्यात आली आहे, प्रत्येक व्यक्ती,कंपनी,गैर कंपनी आणि कर व्यावसायिकांसाठी वेगळी कॅटेगरी करण्यात आली आहे. e-filing potal वर ८.४६ कोटींपेक्षा अधिक वैयक्तिक नोंदणीकृत युझर्स आहेत. २०२०-२१साठी ३.१३ करोडून जास्त ITRs ई व्हेरिफाईड आहेत. तर नवीन पोर्टलवर युझर मॅनुअल,FAQs आणि व्हिडिओ देखील आहे. ज्यामुळे युझर्सना वेबसाइट समजणे सोपे होईल. त्याचप्रमाणे एखादी शंका असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी Chatbot आणि हेल्प लाईन नंबरही देण्यात आला आहे.


हेही वाचा – Jeff Bezos : Amazon चे संस्थापक जेफ बेजोस निघाले अंतराळ प्रवासाला, २० जुलैला पोहणार चंद्रावर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -