घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये रोबोट करणार नदी - नाल्यांची सफाई

नाशिकमध्ये रोबोट करणार नदी – नाल्यांची सफाई

Subscribe

महापौरांनी केली अंदाजपत्रकात तरतूद

नदी व नाल्यांच्या सफाईसाठी आणखी नवीन दोन रोबोट मशिन खरेदीचा प्रस्ताव महापौरांनी सादर केला असून त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय वादग्रस्त ठरलेल्या पावसाळी गटारींसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

मान्सूला प्रारंभ झाला असून गेल्या महीन्यात पावसाळा पूर्व कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्याअनुशंगाने पावसाळापूर्व झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. ८) ड्रेनेज व बांधकाम विभागाच्या कामांचा प्रगती आढावा महापौरांनी घेतला. यावेळी भुयारी गटार योजनेचे कामकाजा संबधीची माहीती घेतांना संबधीत विभागाचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी सांगितले की, मोठे नाले व नदी सफाई साठी विभागाकडे एक रोबोट मशिन उपलब्ध आहे. शहराची गरज लक्षात घेता नव्याने दोन रोबेाट मशिन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी महापौरांनी सांगितले की, पुढील काळात पावसाळ्यात शहरातील ज्या भागात पाणी साचून समस्या निर्माण होतील त्याचा अभ्यास करुन पुढील पावसाळयापूर्वी त्यावर तोडगा काढून या भागांत पुन्हा पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. सखल भागात पावसाचे पाणी साचु नये त्याचा योग्य पध्दतीने निचरा होण्यासाठी नियोजन करावे, नाल्यांची सफाई योग्य रीतीने होत आहे की नाही याचा खुलासा घेऊन नागरिकांच्या तक्रारी प्राप्त् होणार नाही अशा पध्दतीने कामकाज झाले पाहीजे असा आदेश खातेप्रमुखांना देण्यात आला.

- Advertisement -

पावसाळा सुरु झाला; मात्र अजूनही २० टक्के कामे बाकी

शहरात पावसाळ्याला सुरुवात झाल्याने आतापर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्णत्वास येणे गरजेचे होते. असे असतानाही प्रत्यक्षात अजूनही २० टक्के कामे बाकी आहेत. यासंदर्भात शहर अभियंता संजय घुगे यांनी ८० टक्के कामे पूर्णत्वास
आल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -