घरताज्या घडामोडीBlack Fungus: मुंबईत काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे १४ वर्षींय मुलीला गमवावा लागला डोळा

Black Fungus: मुंबईत काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे १४ वर्षींय मुलीला गमवावा लागला डोळा

Subscribe

मुलगी मुळची कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील. काही दिवसांपूर्वी तिचा एक डोळा सुजल्यामुळे दिसणे कमी झाले होते

कोरोनानंतर होणाऱ्या जिवघेण्या म्युकरमायकोसिस(mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरशीने (black fungus) महाराष्ट्रात थैमान घातले आहे. मुंबईतही काळ्या बुरशीमुळे आपले डोळे गमावलेल्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. लहान मुले,तरुण, वृद्ध सर्वांमध्ये काळ्या बुरशीचा आजार दिसून आला आहे. असाच एक धक्कायादक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. मुंबईच्या कूपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १४ वर्षींय मुलीला काळ्या बुरशीच्या जीवघेण्या आजारामुळे आपला डोळा गमवावा लागला आहे. (Black Fungus: 14-year-old girl lose eye due to mucormycosis black fungus infection in Mumbai) ही मुलगी मुळची कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील. काही दिवसांपूर्वी तिचा एक डोळा सुजल्यामुळे दिसणे कमी झाले होते. त्यामुळे तिला उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आले. उपचारादरम्यान तिला काळ्या बुरशीचे निदान झाल्याचे निष्पन्न झाल्याने तिला आपला एक डोळा कायमचा गमवावा लागला.

मटा या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या कूपर रुग्णालयातील नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. चारुता मांडके यांनी सांगितल्यानुसार, १४ वर्षीय मुलीचा उजवा डोळा सुजल्याने तिला दिसत नव्हते. गेल्या आठवड्यात तिला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोळ्यात ट्यूमर असण्याची शक्यता होती त्यामुळे तिचा डोळा काढावा लागणार होता. त्यानंतर तिला म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी झाल्याचे निदान झाले त्यानंतर कूपर रुग्णालयातील नेत्रविकारतज्ज्ञांनी ऑपरेशन करुन तिचा उजवा डोळा काढून टाकला.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मुलीच्या अँटिबॉडीजची तपासणी करण्यात आली त्यात तिला काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग होऊन गेल्याचे समोर आले. मुलीला कोणत्याही प्रकारचे स्टिरॉइड देण्यात आल्याची शक्यता नाही. कोरोना व्हायरच्या बदलत्या व्हेरिएंटमुळे मुलीला म्युकरमायकोसिस झाल्या का याचा अभ्यास कूपर रुग्णालय करत असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – India Corona Update: देशाच्या रुग्णसंख्येत घट, १ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -