घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुलाबजाम खाल्ल्याने मुलीचा मृत्यू

गुलाबजाम खाल्ल्याने मुलीचा मृत्यू

Subscribe

घरी बनवलेले गुलाबजाम खाल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री अंबड येथील चुंचाळे परिसरात घडली. मात्र, पूर्वीच्या आजारातून तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. काजल लहानू खेमनर (रा. दत्तनगर, चुंचाळे शिवार, अंबड) असे मृत मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमनर कुटुंबियांच्या घरी सहा दिवसांपूर्वी गुलाबजाम तयार करण्यात आले होते. ते घरातील फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री अचानक उलट्या आणि चक्करचा त्रास होऊन काजल बेशुद्ध पडली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी काजलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. गुलाबजाम खाल्ल्याने तिला विषबाधा होऊन झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरीही, वैद्यकीय तज्ज्ञांनी मात्र काजलला पूर्वीपासूनच त्रास होता, त्यातून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -