घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसूत्रधार कैलास शहावर कारवाईनंतरही रोलेटची चक्र वेगात

सूत्रधार कैलास शहावर कारवाईनंतरही रोलेटची चक्र वेगात

Subscribe

शहरात रोलेटप्रकरणी तीन बुकींना अटक; शहर पोलिसांची कारवाई

रोलेटचा मुख्य सूत्रधार कैलास शहा व त्याच्या साथीदारांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असली तरी अजूनही नाशिक शहरात रोलेटचे अर्थचक्र वेगात सुरू आहे. नाशिक शहर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तीन बुकींना अटक केली. विवेक मदन कोथमिरे (रा. औरंगाबादरोड), प्रकाश प्रभाकर वाघ (रा. अशोकनगर, सातपूर) व आशिष राजेंद्र जाधव (रा. शिवाजीनगर, सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, औरंगाबादरोडवरील डाळिंब मार्केट परिसरात एक बुकीने रोलेट गेमवर इंटरनेटच्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या मोबाइलमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. पैसे घेऊन पॉईंट देत त्या पॉईंट अंकावर पैसे लावत ऑनलाइन बुकिंग घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित विवेक कोथमिरे यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी, रक्कम, ऑनलाईन जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. दुसर्‍या कारवाईत पपया नर्सरी येथे काही संशयित रोलेट ऑनलाइन जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने प्रकाश वाघ, आशिष जाधव या दोघांना अटक केली. ग्राहकांना अंक देऊन एक रुपयास ३६ रुपये देत ऑनलाईन जुगार खेळण्यास भाग पाडत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयिताकडून १५ हजार रुपयांची रक्कम व इतर साहित्य जप्त केले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सीताराम कोल्हे, अजय शिंदे, श्रीराम पवार यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -