घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: बाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट; १० हजार ४४२...

Maharashtra Corona Update: बाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट; १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनामुळे सातत्याने बाधितांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी राज्यात ११,७६६ बाधितांची नोंद करण्यात आली होती, तर शनिवारी १०,६९७ आज रविवारी गेल्या २४ तासात १०,४४२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. यासह राज्यात आज ४८३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने आतापर्यंत १ लाख ११ हजार १०४ जणांच्या कोरोनामुळे प्राण गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे.

दरम्यान, आज राज्यात १०,४४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,०८,९९२ झाली आहे. यासह आज ७,५०४ रुग्ण बरे होऊन त्यांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,३९,२७१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४४ टक्के एवढे झाले आहे. . तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८०,४६,५९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,०८,९९२ (१५.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६२,१३४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,१६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या एकूण ४८३ मृत्यूंपैकी २८४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २२८८ ने वाढली आहे. हे २२८८ मृत्यू, नाशिक-४६७, नागपूर-३५१, पुणे-३२४, अहमदनगर-२४९, सातारा-१४८, सांगली-८९, ठाणे-८९, जळगाव-७०, मुंबई-६७, अकोला-६२, उस्मानाबाद-५२, जालना-३९, लातूर-३५, वर्धा-३१, कोल्हापूर-२६, धुळे-२२, रायगड-१९, पालघर-१८, परभणी-१८, रत्नागिरी-१४, सोलापूर-१४, भंडारा-१३, गोंदिया-१३, नांदेड-१३, नंदूरबार-१२, चंद्रपूर-११, यवतमाळ-६, हिंगोली-४, अमरावती-३, बीड-३, औरंगाबाद-२, गडचिरोली-२, बुलढाणा-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -