घरटेक-वेकWhatsAppवर ब्लॉक झाल्यानंतरही करून शकता मॅसेज, जाणून घ्या मजेशीर Tricks

WhatsAppवर ब्लॉक झाल्यानंतरही करून शकता मॅसेज, जाणून घ्या मजेशीर Tricks

Subscribe

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या Appमध्ये Whatsapp एक आहे. जर तुम्ही Whatsapp युजर असला तर तुम्हाला काही असा ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या ऐकून तुम्ही हैराण व्हाल. Whatsppवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले, तर त्या व्यक्तीसोबत चॅट कसे करणार? असा प्रश्न नक्की पडला असेल. कारण अजूनही असे कोणतेही फिचर आले नाही आहे की, तुम्ही ब्लॉक केलेल्या व्यक्तीशी बोलू शकाल. परंतु काही ट्रिक्स वापरून तुम्ही असे करू शकता. आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगणार आहोत.

Whatsapp अकाउंट डिलीट करा

Whatsapp अकाउंट डिलीट करून ते पुन्हा साइन अप करा. यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्या व्यक्तीला मॅसेज करू शकता. जर त्या व्यक्तीने पुन्हा ब्लॉक केले, तर पुन्हा तुम्हाला हिची ट्रिक वापरावी लागले. पण असे करण्यापूर्वी तुम्ही तुमचा डाटा सेव्ह नक्की करा. कारण अकाउंट डिलीट केल्यानंतर तुमचा डाटा गायब होऊ शकतो. त्यामुळे डाटा एक्सपोर्ट करायला विसरू नका.

- Advertisement -

तिसरी व्यक्तीस ग्रुप तयार करण्यास सांगा

एखाद्या कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीने Whatsappवर ग्रुप करा. त्यामध्ये तुम्ही आणि ब्लॉक केलेल्या व्यक्तीला अॅड करण्यास सांगा. यामुशे ग्रुपच्या माध्यमातून तुमचे बोलणे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. तुम्ही ग्रुपवर जो काही मॅसेज कराल, ते सर्व सदस्यांना दिसतील. जेव्हा तो व्यक्ती ग्रुपवर मॅसेज करेल, ते तुम्हाला दिसेल. पण जर ग्रुप तयार करणारा व्यक्ती लेफ्ट झाला, तर तुम्ही दोनच व्यक्ती सरळसरळ बोलू शकता.

इतर काही टिक्स जाणून घ्या

  • जर तुम्हाला Whatsappवर विना ब्लू टिक दिसता कोणत्याही व्यक्तीचा मॅसेज पाहायचा असेल, तर सर्वात पहिल्यांदा स्मार्टफोनमधील फ्लाईट मोड ऑन करा. त्यानंतर मॅसेज बघा आणि मॅसेज पाहिल्यानंतर परत फ्लाईट मोड ऑफ करा.
  • तसेच तुम्ही स्टेट्सच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन हे सिलेक्ट करू शकता की, कोण-कोण तुमचा स्टेट्स पाहू शकतात. तसेच कोणाला तुमचा स्टेट्स दाखवायचा नसेल ते देखील तुम्ही करू शकाल.
  • ज्या व्यक्तीसोबत तुम्ही सर्वाधिक चॅट करता, त्याचे चॅट तुम्ही Whatsappमध्ये Pinned करू शकता. ज्यामुळे त्या व्यक्तीसोबतचे चॅट तुम्हाला सर्वात वरती दिसतील.

हेही वाचा – Facebook Trick: फेसुबकवरून तुमचा डाटा होतोय शेअर? तर याला कसे रोखाल?

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -