घरCORONA UPDATECovaxin सरकारला १५० रूपयात दीर्घकाळ देणे भारत बायोटेकला अशक्य

Covaxin सरकारला १५० रूपयात दीर्घकाळ देणे भारत बायोटेकला अशक्य

Subscribe

देशात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक राज्याकडून प्रयत्न केले जात आहे. तसेच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडूनही कमीतकमी किंमतींमध्ये लसीचा पुरवठा राज्यांना कसा देता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता Covaxin लसांचा पुरवठा करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने दीर्घकाळासाठी १५० रुपयांत लस पुरवणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे देशांत पुन्हा लसीकरण मोहिमेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकने स्पष्टीटकरण देत सांगितले की, केंद्र सरकारला कोरोनाविरोधी लसीचा प्रति डोस १५० रुपयांप्रमाणे देणे फार काळ शक्य नाही. कारण केंद्र सरकारच्या पुरवठा शुल्कामुळे खासगी क्षेत्रांतील लसींच्या किंमतींमध्ये सतत बदल होत असून वाढत आहेत. इतर खासगी लसींच्या तुलनेत कोवॅक्सीनचे दर अधिकच कमी आहेत आहेत त्यांमुळे या दरात सतत्या ठेवणे कंपनीसाठी तोट्याचे आहे.

- Advertisement -

भारतात खाजगी क्षेत्रातील उपलब्ध इतर कोरोना लसींच्या तुलनेत कोवॅक्सीन लसींना अधिक दर मिळणे उचित असल्याचे भारत बायोटेकने सांगितले आहे. यामागे कमी मूलभूत किंमतीत खरेदी, वितरणातील उच्च किंमत आणि किरकोळ नफा अशी अनेक मूलभूत व्यावसायिक कारणे असल्याचेही भारत बायोटेकने सांगितले आहे.त्यामुळे भारत सरकारला कोवॅक्सीन लस १५० रुपये पुरवठा किंमतीला दिली जाते मात्र ही पुरवठा किंमत सतत बदलणारी आहे.

त्यामुळे लसींचा एक डोस १५० रुपये किंमतीला देणे यापुढे कंपनीला शक्य होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटले आहे की, खर्च पूर्ण करण्यासाठी खासगी बाजारात लसींची किंमत जास्त ठेवणे आवश्यक आहे. भारत बायोटेकने आतापर्यंत लस निर्मिती, क्लिनिकल ट्रायल आणि कोवॅक्सींची निर्मितीचे युनिट उभारण्यासाठी आत्तापर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्गात वाढता कोरोना संसर्ग, डॉक्टरांची टीम पाठवण्याची सुरेश प्रभुंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -